शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

सेकंड हँड गाडी घेताना अ‍ॅक्सिडेंटल हिस्ट्री कशी तपासाल? एक ट्रिक जी लोकांना माहितीच नाहीय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 18:02 IST

Used Car Buying Tips: आजकाल अनेकजण अपघात झाला की कार, बाईक लोकल गॅरेजमध्ये नव्यासारखी करून घेतात. पूर्वी कंपन्यांच्या सर्विस सेंटरमध्ये काम केलेले लोक अशी गॅरेज खोलून बसलेले आहेत.

सध्या नव्या गाड्या घेणे लोकांना परवडणारे नाहीय. आता तर तीन वर्षांपूर्वीच्या डिझेल कारच्या किंमतीत पेट्रोल कार येऊ लागल्या आहेत. स्वस्तातली अल्टोच आता साडेचार-पाच लाखांवर गेली आहे. मग ज्यांचे बजेट कमी आहे ते लोक सेकंड हँड कार घेऊ लागले आहेत. उगाच हप्ते भरा, महागलेले इंधन भरा यापेक्षा जुनी चांगली वापरलेली, अपघात न झालेली कार घेण्याकडे अनेकांचा कल असतो. झालं का... आता अपघात न झालेली कशी शोधायची...

...तर नव्या कारवर देखील वॉरंटी नाकारतात कंपन्या; या गोष्टींशी छेडछाड करू नका

आजकाल अनेकजण अपघात झाला की कार, बाईक लोकल गॅरेजमध्ये नव्यासारखी करून घेतात. पूर्वी कंपन्यांच्या सर्विस सेंटरमध्ये काम केलेले लोक अशी गॅरेज खोलून बसलेले आहेत. यामुळे त्यांच्याकडे याचे कौशल्य असते. यामुळे अपघात झाला की नाही हे तपासण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतू, जर इन्शुरन्स मधून एखाद्याने अपघात झालेल्या कारचे काम करून घेतले असेल तर तुम्ही तसे तपासू शकता. यासाठी सरकार तुम्हाला मदत करणार आहे. 

भारतातील कोणत्याही वाहनाचा अपघात इतिहास कसा तपासायचा?कोणत्याही वाहनाचा अपघात इतिहास तपासण्यासाठी सर्वप्रथम, वाहनाचा आरसी क्रमांक माहिती हवा. यावरून वाहनाचा अतिरिक्त तपशील सहज उपलब्ध होतो.आरसी नंबर आणि नंबर प्लेटचा नंबर घेतल्यानंतर, तुम्हाला वाहन नोंदणीकृत असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला अधिकृत साइटवर जाऊन तुमचे राज्य आणि आरटीओ स्थान निवडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला व्हेईकल इंफॉर्मेंशन सेक्शन मिळेल. 

Tyre Burst Accident: भर वेगात टायर फुटण्यापासून स्वत:ला कसे वाचवाल? नंतर वेळ निघून गेलेली असते...

RTO वेबसाइटवर नोंदणी क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या वाहनाचा अपघात रेकॉर्ड तपासू शकता. यामुळे कारचे किती अपघात झाले आहेत आणि ते ‘स्क्रॅप’ वाहन म्हणून घोषित करण्यात आले आहे की नाही याची झटपट माहिती मिळेल. तुम्ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MORTH) वेबसाइटला भेट देऊन  वाहनाची इतर माहिती देखील मिळवू शकता. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने एकीकृत रस्ते अपघात डेटाबेस (IRAD) तयार केला आहे. या अॅपद्वारे, पोलिस, अपघाताच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर, अपघाताचा संपूर्ण तपशील भरतो, जो थेट भारत सरकारपर्यंत पोहोचतो. पोलीस कर्मचारी आणि सहाय्यक विभागीय परिवहन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप उपलब्ध असते.

टॅग्स :carकार