शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

E-Scooter Mileage TIPS: इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज कशी वाढवाल? ही काळजी घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 4:35 PM

electric scooters tips : कमी खर्चात जास्त अंतर कापण्यासाठी या स्कूटर उपयोगी ठरू लागल्या आहेत. अनेकजण असे आहेत ज्यांच्याकडे इलेक्ट्रीक स्कूटर आहे परंतू कंपनीने केलेल्या दाव्यानुसार रेंज देत नाही.

भारतात इलेक्ट्रीक स्कूटरला आता मागणी वाढू लागली आहे. यामागे परवडणाऱ्या बाईक असल्याचे मुख्य कारण आहे. पेट्रोलच्या किंमती वाढू लागल्या आहेत. यामुळे सामान्यांना रोजचा प्रवास आपल्याच वाहनाने करायचा असल्याने स्कूटरही हळूहळू परवडेनाशी झाली आहे. स्कूटरला 45 ते 55 चे खरे मायलेज मिळतेय. यामुळे छोट्या छोट्या शहरांतही आता इलेक्ट्रीक स्कूटर दिसू लागल्या आहेत. 

कमी खर्चात जास्त अंतर कापण्यासाठी या स्कूटर उपयोगी ठरू लागल्या आहेत. अनेकजण असे आहेत ज्यांच्याकडे इलेक्ट्रीक स्कूटर आहे परंतू कंपनीने केलेल्या दाव्यानुसार रेंज देत नाही. यामुळे ही स्कूटर रेंजच्या निम्म्याहून अधिक अंतर कापल्यावर बंद पडते. जर ही स्कूटरची बॅटरी लवकर संपत असेल तर त्यात काही तांत्रिक बिघाड असतोच असे नाही.तुम्ही काही टिप्स फॉलो करून स्कूटरची रेंज 10 ते 20 टक्के वाढवू शकता. 

कारचे अ‍ॅव्हरेज कमी झालेय का? या ट्रिक फॉलो करा, 10 टक्के जास्त मिळवा...

इकॉनॉमी मोड - कोणत्याही इलेक्ट्रीक स्कूटरला इकॉनॉमी मोडवर चालविणे गरजेचे असते. हे अशासाठी कारण इकॉनॉमी मोडमध्ये बॅटरी कमी वापरली जाते. यामुळे तुम्ही 5 ते 10 किमीची रेंज वाढवू शकता.

FASTag खरेदी करायचाय? जाणून घ्या मनातील समज गैरसमज...

डीप डिस्चार्ज -

अनेकजण स्कूटर तेव्हाच बंद करतात जेव्हा बॅटरी पूर्ण संपते. याला डीप डिस्चार्ज म्हणतात. मोबाईल बाबतही तसेच आहे. सारखी सारखी बॅटरी चार्ज करायची नाही अन् बॅटरी मोबाईल बंद होईपर्यंत संपू द्यायची नाही. यामुळे बॅटरीवर परिणाम होऊ लागतो. खूपदा असे केल्यास स्कूटरची बॅटरी अचानक तापू लागते. यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते. यामुळे नेहमी 20 टक्के बॅटरी उरलेली असेल तेव्हा ती चार्जिंग करावी. 

इलेक्ट्रीक वाहन घेण्याचे फायदेच अधिक; तोटे फक्त २...जाणून घ्या...

सहप्रवासीइलेक्ट्रीक स्कूटरची रेंज जर वाढवायची असेल तर तुमच्या स्कूटरवर दुसरा व्यक्ती मागे बसलेला असता नये. असे झाल्यास त्याचे वजन वाढून वीज जास्त खर्च होते. मोटरवर लोड वाढतो आणि बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. 

महिंद्रांनी फेकला हुकमी 'पत्ता'; XUV300 पेट्रोल AutoSHIFT लाँच, 40 हून अधिक कनेक्टेड फिचर

वातावरण - जर तुम्हाला इलेक्ट्रीक स्कुटरची रेंज चांगली वाढवायची असेल किंवा रेंज जास्त मिळावी असे वाटत असेल तर हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यात तुम्हाला स्कूटरची काळजी घ्यावीच लागेल. खूप थंडी किंवा खूप उष्णता असेल तर स्कूटरच्या बॅटरीवर परिणाम होऊ लागतो. उन्हात स्कूटर उभी केली तर बॅटरीचे तापमान वाढू शकते. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन