तासांचे अंतर मिनिटांत पार होणार, ऑटो एक्स्पोमध्ये लाँच झाली देसी एअर टॅक्सी'शून्य'; ६ जण प्रवास करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:05 IST2025-01-21T18:00:34+5:302025-01-21T18:05:45+5:30

एरोस्पेस स्टार्टअप सरला एव्हिएशनने इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये हवेत उडणारी एअर टॅक्सी शून्य प्रदर्शित केली आहे. ही एअर टॅक्सी ताशी २५० किमी वेगाने हवेत उडू शकते. यामुळे आता शहरात ट्राफिकचे टेन्शन मिटणार आहे.

Hours will pass in minutes, Desi Air Taxi 'Zero launched at Auto Expo; 6 people will travel | तासांचे अंतर मिनिटांत पार होणार, ऑटो एक्स्पोमध्ये लाँच झाली देसी एअर टॅक्सी'शून्य'; ६ जण प्रवास करणार

तासांचे अंतर मिनिटांत पार होणार, ऑटो एक्स्पोमध्ये लाँच झाली देसी एअर टॅक्सी'शून्य'; ६ जण प्रवास करणार

शहरात अनेक ठिकाणी ट्राफिकला सामोरे जावे लागते. काही मिनिटांच्या प्रवासाला ट्राफिकमुळे दोन- दोन तास उशीर होतो. पण, आता या ट्राफिकचे टेन्शन मिटणार आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेला इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो (BMGE 2025) अनेक प्रकारे खूप खास आहे. यावेळी, अनेक कार, बाईक आणि व्यावसायिक वाहने सादर करण्यात आली. तर विमान वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनात बंगळुरूस्थित एरोस्पेस स्टार्टअप सरला एव्हिएशनने त्यांचा प्रोटोटाइप एअर टॅक्सी शून्य देखील प्रदर्शित केला आहे. या एअर टॅक्सीमधून सहा जण प्रवास करु शकणार आहेत. यामुळे रस्त्यावर असणाऱ्या ट्राफिकपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

एथरने किंमती १०,००० नी घटविल्याचे सांगितले, पण 'रंग' दाखविला; घोडे-भाडे तेच...

हे एक eVTOL (इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग) वाहन आहे. याचे वाहन एअर टॅक्सी म्हणून वापरले जाईल. ही एअर टॅक्सी शेकडो किलोमीटरचे अंतर काही मिनिटांत पूर्ण करू शकेल. वाहतूक कोंडी असलेल्या महानगरांसाठी ही हवाई टॅक्सी एक अतिशय उपयुक्त साधन म्हणून पाहिली जात आहे. शहरी हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी कंपनी २०२८ पर्यंत बंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सुरू करण्याचे नियोजन करत आहे.

६ जण प्रवास करु शकणार

सध्या, कंपनीने झिरोचा प्रोटोटाइप सादर केला आहे आणि उत्पादनासाठी तयार मॉडेलपर्यंत पोहोचताना त्यात अनेक बदल दिसून येतात. ही एअर टॅक्सी ताशी २५० किमी वेगाने हवेत उडू शकते. हे आधुनिक बॅटरी तंत्रज्ञानासह १६० किमीसाठी डिझाइन केलेले आहे आणि २५-३० किमी प्रवास करण्यास सक्षम आहेत.  त्यात ६ प्रवासी आणि एक ड्रायव्हर एकत्र बसू शकतात. ही हवाई टॅक्सी जास्तीत जास्त ६८० किलो वजन उचलण्यास सक्षम आहे.

सरला एव्हिएशनचे सह-संस्थापक आणि सीईओ एड्रियन श्मिट म्हणाले, "वाहतूक कोंडी आणि प्रदूषण यासारख्या आव्हानांना तोंड देऊन, आमचे ध्येय भारताच्या आर्थिक क्षमतेला उलगडणे आहे जेणेकरून आपण स्वच्छ आणि अधिक कनेक्टेड भविष्याचा मार्ग मोकळा करू शकू.

मोठी केबिन

या एअर टॅक्सीचे केबिन अॅडव्हान्स फिचरांनी आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. ६-सीटर आणि ४-सीटर कॉन्फिगरेशन व्यतिरिक्त, ते मालवाहू वाहन म्हणून देखील कस्टमाइझ केले जाऊ शकते. हे फक्त प्रवासी वाहन म्हणून वापरले जाणार नाही तर मालवाहू वाहक म्हणून देखील वापरले जाऊ शकते. हे eVTOL वाहन असल्याने, हवेत उड्डाण करण्यासाठी त्याला मोठ्या धावपट्टीची आवश्यकता नाही. ते त्याच्या जागेवरून उभ्या म्हणजेच थेट हवेत उडू शकेल.

Web Title: Hours will pass in minutes, Desi Air Taxi 'Zero launched at Auto Expo; 6 people will travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.