Honda Elevate: जबरदस्त फीचर्स अन् परवडणारी किंमत; Honda ने लॉन्च केली नवीकोरी Elevate SUV
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 14:52 IST2023-06-06T14:52:49+5:302023-06-06T14:52:56+5:30
Honda Elevate: होंडाने नवीन SUV-Elevate लॉन्च केली असून, जुलै महिन्यात बुकिंग सुरू होणार आहे.

Honda Elevate: जबरदस्त फीचर्स अन् परवडणारी किंमत; Honda ने लॉन्च केली नवीकोरी Elevate SUV
Honda Elevate: भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी होंडाने(Honda) आपली नवीकोरी मिड साइज SUV-Elevate लॉन्च केली आहे. या गाडीसोबतच कंपनीकडे या पोर्टफोलियोमध्ये 3 मॉडेल (सिटी, अमेझ आणि एलिव्हेट) असतील. Honda Elevate ची बुकिंग पुढील महिन्यात(जुलै) सुरू होणार आहे, तर दिवाळीपर्यंत गाडी ग्राहकांना मिळण्याची अपेक्षा आहे.
कंपनीने याचे डिझाईन न्यू जनरेशन CR-V आणि WR-V वरुन घेतले आहे. कंपनीने यात 1.5L, 4-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 121bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच, यात 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT चा पर्याच आहे.
कंपनीने एलिव्हेटमध्ये वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिविटी, 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, 7 इंच सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्ज, कनेक्टेड कार टेकसह अनेक फीचर्स आहेत.
यात सिंगल-पॅन सनरुफ मिळेल. ब्रेकिंगसाठी यात ADAS (अॅडव्हान्स ड्रायवर असिस्टेंस सिस्टम) दिले आहे. याशिवाय, अॅडेप्टिव क्रूज कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टम, रोड डिपार्चर वार्निंग आणि ऑटोमॅटिक हाय बीम असिस्टसारखे फीचर्सदेखील आहेत. या गाडीची किंमत 11 लाख(एक्स-शोरुम)पासून सुरू होण्याचा अंदाज आहे.