शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

Honda ची सर्वात लोकप्रिय अन् स्वस्त बाईक; कंपनीने बंद केले उत्पादन, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:34 IST

Honda CD 110: होंडाने आपल्या या बाईकचे उत्पादन कायमचे बंद केले आहे.

Honda CD 110 Motorcycle: भारतातील आघाडीची टू-व्हिलर उत्पादक कंपनी होंडाबाईक अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने त्यांची सर्वात स्वस्त आणि एंट्री-लेव्हल कम्युटर बाईक CD 110 ड्रीमचे उत्पादन बंद केले आहे. ही बाईक गेल्या 11 वर्षांपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होती. कमी किंमत आणि सादारण डिझाइनमुळे सामान्य वर्गात या बाईकची खूप लोकप्रियता होती.

CD 110 ड्रीमचे उत्पादन बंद करण्याचा अर्थ असा नाही की, होंडा कम्युटर सेगमेंटमधून बाहेर पडत आहे. कंपनीची शाइन 100 बाईक या सेगमेंटमध्ये कायम राहणार आहे.

CD 110 ड्रीम बंद करण्याचे कारण

अलिकडच्या वर्षांत, CD 110 ड्रीमच्या विक्रीत सातत्याने घट झाली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये फक्त 8,511 युनिट्सची विक्री झाली, तर मार्च 2025 पर्यंत विक्री फक्त 33 युनिट्सवर आली. या घटत्या मागणीमुळे, होंडाने ही बाईक बंद करण्याचा निर्णय घेतला. शाइन 100 लॉन्च केल्याने CD 110 ड्रीमची स्थिती आणखी कमकुवत झाली होती. शाइन 100 फक्त 66,900 च्या किमतीत बाजारात आली, ज्यामध्ये चांगले मायलेज आणि विश्वासार्हता होती. यामुळेही CD ड्रीमची मागणी कमी होत गेली.

इंजिन आणि परफॉरमन्ससीडी 110 ड्रीमला 109.51 सीसी एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले होते, जे 8.6 बीएचपी पॉवर आणि 9.3 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ओबीडी2 उत्सर्जन मानदंड आणि ई20 इंधनाचे पालन करून बनवण्यात आले होते. या बाईकला 4 स्पीड गिअरबॉक्स मिळतात.

इतर फिचर्ससीडी 110 ड्रीमला टू-वे इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच देण्यात आला होता. त्यात कॉम्बी-ब्रेक सिस्टम (सीबीएस) समाविष्ट होते, ज्यामुळे ब्रेकिंग चांगले आणि सुरक्षित होते. बाईकला 5 स्पोक सिल्व्हर अलॉय व्हील्स आणि डायमंड प्रकारची फ्रेम देण्यात आली होती, ज्यामुळे तिची ताकद वाढली. सस्पेंशनसाठी त्यात टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक अ‍ॅब्झॉर्बर होते. 

शाइन 100 ने CD 110 ड्रीमची जागा घेतलीCD 110 ड्रीमच्या विक्रीवर परिणाम करणारे सर्वात मोठे कारण म्हणजे होंडा शाइन 100 लॉन्च करणे. शाइन 100 ची किंमत CD 110 ड्रीमपेक्षा सुमारे 10,000 ने स्वस्त आहे. ही बाईक कम्युटर सेगमेंटमधील ग्राहकांच्या गरजा देखील पूर्ण करते. शाइन 100 मध्ये 98.98cc इंजिन आहे, जे 5.3bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. यात 17-इंच अलॉय व्हील्स, 130 मिमी फ्रंट आणि 110 मिमी रियर ड्रम ब्रेक आहेत. याची एक्स-शोरूम दिल्ली किंमत सुमारे 62,000 रुपये आहे.

टॅग्स :HondaहोंडाbikeबाईकAutomobileवाहन