E20 वर शहरात ६० चे मायलेज देणारी स्पोर्टी मोटरसायकल! कोणती असेल बरे? पुण्याचा सिंहगड रोड अन् हायवेवरील अनुभव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:43 IST2026-03-25T13:41:42+5:302026-03-25T13:43:08+5:30

Honda CB125 Hornet रिव्ह्यू: पुण्यातील ट्रॅफिकमध्ये ६० चे मायलेज देणारी होंडाची नवीन स्पोर्टी बाईक. E20 पेट्रोलवर चालणारी, स्टायलिश लूक आणि प्रीमियम फिचर्स. वाचा सविस्तर अनुभव.

Honda CB125 Hornet Review Marathi: A sporty motorcycle that gives 60 city mileage on E20! Honda's CB Hornet 125 and Pune's Sinhagad Road... | E20 वर शहरात ६० चे मायलेज देणारी स्पोर्टी मोटरसायकल! कोणती असेल बरे? पुण्याचा सिंहगड रोड अन् हायवेवरील अनुभव...

E20 वर शहरात ६० चे मायलेज देणारी स्पोर्टी मोटरसायकल! कोणती असेल बरे? पुण्याचा सिंहगड रोड अन् हायवेवरील अनुभव...

भारतीय रस्ते आणि तरुणांची पसंत लक्षात घेऊन होंडाने आपली नवीन CB125 Hornet बाजारात आणली आहे. आम्ही पुण्याच्या गजबजलेल्या सिंहगड रोडच्या ट्रॅफिकमध्ये आणि हायवेवर या बाईकची जवळपास २८० किमी टेस्ट राईड घेतली. E20 इंधनावर चालणारी ही बाईक खरोखरच 'पॉकेट फ्रेंडली' आहे का? जाणून घेऊया या सविस्तर रिव्ह्यूमध्ये.

१. लूक आणि डिझाइन 
कॉलेज तरुण आणि स्वतःला तरुण समजणाऱ्या तिशीतील रायडर्सना ही बाईक पहिल्या नजरेतच भावते. याचे मुख्य आकर्षण म्हणजे पुढचे गोल्डन रंगाचे अपसाईड डाऊन (USD) फोर्क्स, जे बाईकला एक दणकट आणि प्रीमियम लूक देतात. सायलेन्सरचा लूक आणि त्याचा येणारा स्पोर्टी आवाज रायडिंगचा आनंद द्विगुणित करतो.

२. इंजिन परफॉर्मन्स आणि मायलेज 
यामध्ये १२५ सीसीचे इंजिन असून ते स्लिम-ट्रिम रायडर्ससाठी पुरेशी ताकद निर्माण करते. इंजिनचा आवाज शांत असला तरी पिकअप घेताना ते आपली शक्ती दाखवून देते.

शहरातील मायलेज: पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये सतत गिअर बदलावे लागूनही या बाईकने ५८ ते ६०.१ किमी/लिटर इतके जबरदस्त मायलेज दिले.

हायवे मायलेज: हायवेवर हा आकडा ६७ ते ६८ किमी/लिटर पर्यंत जातो.

E20 पेट्रोल: ही बाईक भविष्यातील E20 इंधनासाठी तयार असल्याने वाढत्या महागाईत तुमच्या खिशाला मोठा दिलासा देते.

३. राईड क्वालिटी आणि ब्रेकिंग
शहरातील रंबल स्ट्रिप्स आणि मोठ्या स्पीडब्रेकरवर या बाईकचे सस्पेन्शन उत्तम काम करते. धक्के रायडरपर्यंत फारसे जाणवत नाहीत. अचानक ब्रेक लावण्याच्या प्रसंगातही बाईक घसरली नाही, तिचे ब्रेकिंग कंट्रोल अत्यंत विश्वासार्ह आहे. वळणांवर (Corners) बाईक चालवताना रायडरचा आत्मविश्वास कमी होत नाही.

४. डिजिटल फिचर्स 
यामध्ये टीएफटी (TFT) डिस्प्ले देण्यात आला आहे, जो ब्ल्यूटूथद्वारे कनेक्ट होतो.

डिस्प्लेवर काय दिसते: मायलेज, ट्रीप मीटर (A/B), इकॉनॉमी सिग्नल, वेग आणि पेट्रोल इंडिकेटर.

रेंज: गाडी किती किमी जाईल याची रेंज यात दिसते, जी मागच्या चालवण्याच्या पद्धतीनुसार बदलत राहते.

५. काही उणिवा आणि निष्कर्ष

कोणतीही बाईक परिपूर्ण नसते. होंडाने एका गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे:

चिखल/पाणी उडणे: मागच्या चाकाचे पाणी रायडरच्या पायावर मागच्या बाजूने उडते. पावसाळ्यात ही समस्या प्रकर्षाने जाणवू शकते, त्यामुळे डिझाइनमध्ये बदल आवश्यक वाटतो.

सीट: मागची सीट थोडी छोटी असल्याने केवळ काटक व्यक्तीच मागे आरामात बसू शकते.

Web Title : Honda CB125 Hornet E20: स्पोर्टी, शानदार माइलेज वाली बाइक!

Web Summary : होंडा की CB125 Hornet E20 स्पोर्टी लुक और शानदार माइलेज देती है। पुणे में परीक्षण के दौरान इसने 58-68 kmpl का माइलेज दिया। बाइक में USD फोर्क्स, TFT डिस्प्ले और बेहतरीन ब्रेकिंग है। कीचड़ से बचाव और पिछली सीट में सुधार की आवश्यकता है।

Web Title : Honda CB125 Hornet E20: Sporty, high mileage bike tested!

Web Summary : Honda's CB125 Hornet E20 offers sporty looks and impressive mileage. Tested in Pune, it delivers 58-68 kmpl. The bike features USD forks, TFT display, and reliable braking. However, improvements are needed for mud splash protection and rear seat size.