भन्नाट ऑफर! ‘ही’ Honda कार १८ ऑगस्ट होतेय लॉंच; बुकिंग प्राइज केवळ ५ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:43 PM2021-08-04T16:43:46+5:302021-08-04T16:45:00+5:30

honda amaze facelift 2021: होंडा कंपनीने आपल्या एका कारचे फेसलिफ्ट व्हर्जन १८ ऑगस्ट २०२१ रोजी लॉंच करत आहे.

honda amaze facelift 2021 booking starts in with just rs 5000 token amount see amazing features | भन्नाट ऑफर! ‘ही’ Honda कार १८ ऑगस्ट होतेय लॉंच; बुकिंग प्राइज केवळ ५ हजार रुपये

भन्नाट ऑफर! ‘ही’ Honda कार १८ ऑगस्ट होतेय लॉंच; बुकिंग प्राइज केवळ ५ हजार रुपये

Next

नवी दिल्ली: जागतिक पातळीवर कार निर्मितीमध्ये आघाडीवर असलेली Honda कंपनी भारतात एकापेक्षा एक उत्पादने सादर करत आहे. यातच होंडा कंपनीने आपल्या एका कारचे फेसलिफ्ट व्हर्जन १८ ऑगस्ट २०२१ रोजी लॉंच करत आहे. या कारची थेट स्पर्धा मारुती डिझायर, ह्युंडाई ऑरा आणि फोर्ड एस्पायर या कारशी असून, नवीन फेसलिफ्ट व्हर्जनच्या बुकिंगसाठी होंडाने केवळ ५ हजार रुपये प्राइज ठेवल्याचे सांगितले जात आहे. (honda amaze facelift 2021 booking starts in with just rs 5000 token amount see amazing features)

Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!

Honda कंपनी १८ ऑगस्ट रोजी आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान कार Honda Amaze ही नवीन फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये लाँच करणार आहे. नवीन Honda Amaze साठी कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन प्री-बुकिंग ५ हजार रुपयांत करता येईल, तर डीलरशिप्समध्ये प्री-बुकिंगसाठी २१ हजार रुपये टोकन अमाऊंट असेल. नवीन फेसलिफ्ट मॉडलमध्ये डिझाइन अपडेटसोबतच नवीन फीचर्स मिळणार असून, ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार असल्याचे सांगितले जात आहे. 

आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!

Honda Amaze Facelift मध्ये नवीन काय?

अमेझ फेसलिफ्ट काही नवीन आकर्षक रंगांमध्ये लाँच होईल. कारमध्ये फुल एलईडी हेडलँप, नवीन अलॉय व्हील्स, नवीन फ्रंट आणि रिअर बंपर मिळण्याची शक्यता आहे. कारच्या समोरील बाजूला जास्त क्रोम एलिमेंटचा वापर केलेला दिसू शकतो, तर इंटीरियरमध्ये नवीन फॅब्रिक अपहोल्स्ट्री आणि नवीन डॅशबोर्ड लेआउट मिळेल. सेच कारच्या बेसिक व्हेरिअंटमध्ये जास्त स्टँडर्ड फीचर्सचा समावेश झालेला असेल. यासोबतच नवीन होंडा अमेझ फेसलिफ्टच्या किंमतीतही थोडीफार वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट!

इंजिन आणि गिअरबॉक्स

२०२१ होंडा अमेझ फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलमधील इंजिन आणि गिअरबॉक्सचाच वापर केला जाईल, असे सांगितले जात आहे. सध्या पेट्रोल व्हर्जन इंजिन १.२ लीटर आणि डिझेल व्हर्जनमध्ये १.५ लिटर डिझेल इंजिनसह होंडा अमेझ येते. आताच्या घडीला अमेझची एक्स-शोरुम किंमत ६.२२ लाख ते ९.९९ लाख रुपये आहे. नवीन फेसलिफ्ट अमेझची किंमत  २५ हजार किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: honda amaze facelift 2021 booking starts in with just rs 5000 token amount see amazing features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.