शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तुफान Video व्हायरल! 'क्रॅश डेटला येताय का?'; टाटा मोटर्सने उडविली मारुती, ह्युंदाईची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 3:02 PM

tata motors crashdate video goes viral : हा व्हिडीओ व्हॅलेंटाईन डे ध्यानात ठेवून बनविण्यात आला असला तरी कार प्रेमींमध्ये आणि इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. कंपनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत दोन हॅचबॅक कार पेटत्या डीआरएलसोबत एका लाल रंगाच्या कापडामध्ये झाकलेल्या आहेत.

बाजारात आता जी ती कंपनी आपण कसे बेस्ट आहोत, या बाबत दावे करू लागली आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सध्या बदलाचे वेगवान वारे वाहू लागले आहेत. सर्वाधिक सेल असलेली मारुती, त्यानंतर ह्युंदाईला आता नव्या, जुन्या कंपन्यांकडून कडवी टक्कर मिळू लागली आहे. या स्पर्धेत या कंपन्या एकमेकांची खिल्ली उडविण्याची एकही संधी सोडत नाहीएत. (Tata Motors CrashDate Video Goes Viral on youtube)

टाटा मोटर्स विक्रीपश्चात सेवा देण्यात मागे असली तरीही दणकट आणि सुरक्षित गाड्या देण्यात मारुती, ह्युंदाईपेक्षा खूप पुढे आहे. त्यांच्या ताफ्यात एकसोएक फाईव्ह स्टार रेटिंगवाल्या गाड्या आहेत. नुकताच टाटाने आपल्या अधिकृत YouTube चॅनेलवर Hi 20 & Bae-Leno, Join ALTROZ FOR A Crash Date अशा नावाचा व्हिडीओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. 

हा व्हिडीओ व्हॅलेंटाईन डे ध्यानात ठेवून बनविण्यात आला असला तरी कार प्रेमींमध्ये आणि इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. कंपनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत दोन हॅचबॅक कार पेटत्या डीआरएलसोबत एका लाल रंगाच्या कापडामध्ये झाकलेल्या आहेत. ज्यामध्ये क्रॅश डेटसोबत टाटा अल्ट्रूझ विचारत आहे. कंपनीने या कारच्या मूळ नावाचा वापर करण्याऐवजी Bae-Leno (Maruti Suzuki Baleno ) आणि Hi 20 (hyundai i20) असे नाव दिले आहे. 

हॅलो क्युपिड्स तुम्हाला सांगू इच्छितो की अल्ट्रूझ आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर प्रेम करते. तुम्ही क्रॅश डेटला येताय का?, असा सवाल करत एकप्रकारे आव्हानच दिले आहे. या जाहिरातीच्या शेवटी वेटरच्या रुपात एक रोबो असून त्याच्या हाती ग्लास आणि टेबलवर शॅम्पेनची बॉटव व शेजारी क्रॅश टेस्ट डमीदेखील पहायला मिळते. 

सध्यातरी मारुती सुझुकी आणि ह्युंदाईने या व्हिडीओला रिप्लाय दिलेला नाहीय. यामध्ये टाटा अल्ट्रूझच्या क्रॅश टेस्ट रेटिंगचाही उल्लेख आहे. ग्लोबल एनकॅपमध्ये टाटाच्या अल्ट्रूझला सुरक्षेचे 5स्टार मिळालेले आहेत. ही रेटिंग मिळविणारी टाटाची नेक्सॉन ही देशातील पहिली कार होती. यानंतर अल्ट्रूझने 5 स्टार रेटिंग मिळवून भारतातील पहिली हॅचबॅक कार बनण्याचा मान मिळविला आहे. 

टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीHyundaiह्युंदाई