शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

हिरोच्या दोन स्कूटर होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देणार; आलिया करत होती जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 4:59 PM

भारतीय कंपनी हिरो मोटर्स 13 मे रोजी दोन स्कूटर नव्या रुपात लाँच करणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय कंपनी हिरो मोटर्स 13 मे रोजी दोन स्कूटर नव्या रुपात लाँच करणार आहे. Maestro Edge 125 आणि Pleasure 110 या स्कूटरचा नव्याने लाँच केल्या जाणार आहेत. माएस्ट्रो एज 125 ला 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये दाखविण्यात आले होते. ही स्कूटर गेल्यावर्षी लाँच झालेल्या हिरोच्या डेस्टीनीवर आधारित आहे. तर प्लेझर 110 चे रुपडे जुन्या स्कूटरपेक्षा खूप वेगळे असणार आहे. 

हिरो माएस्ट्रो एज 125 स्कूटरला डेस्टिनीचे स्पोर्टी मॉडेल समजले जाऊ शकते. यामध्ये युवावर्गाला लक्षात घेऊन बदल करण्यात आले आहेत. या स्कूटरवर शार्प लाईन्स आहेत. तसेच अलॉय व्हील्स आणि युएसबी चार्जिंगची सुविधा मिळणार आहे. स्कूटरमध्ये हिरो i3S स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी असणार आहे. यामुळे स्कूटरचे मायलेज चांगले असेल. 

Maestro Edge मध्ये 125 सीसीचे इंजिन असेल. हे इंजिन 8.7 बीएचपी ताकद आणि 10.2 एनएम पीक टॉर्क देईल. डिजिटल इन्स्ट्रुमेंटल कन्सोलमध्ये साईड स्टँड इंडिकेटर, सर्व्हिस रिमाईंडरची सुविधा मिळणार आहे. तसेच स्कूटरमध्ये पुढे डिस्क ब्रेक पर्याय असणार आहे. नव्या प्लेझरमध्य मोठे बदल होणार आहेत. इंजिनही बदलले जाणार आहे. 110 सीसीचे इंजिन 8.1 एचपीची ताकद आणि 8.7 एनएम टॉर्क तयार करेल.

या स्कूटर होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देतील. माएस्ट्रो एज 125 ची किंमत एक्स शोरुम 55 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. तर प्लेझरची किंमत 45 हजार रुपये असेल. 

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पAlia Bhatआलिया भट