शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

Hero Pleasure+ XTec : हिरोची नवीन स्कूटर लाँच; ब्लूटूथसह कॉल, SMS अलर्टसह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 15:21 IST

Hero Pleasure+ XTec : Hero MotoCorp ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना भुरळ घालण्यासाठी Pleasure+ Xtec वर मोठी बाजी लावत आहे.

हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) देशात नवीन Pleasure + XTec  स्कूटर लाँच केली आहे. स्कूटर आता अनेक नवीन फीचर्ससह सुसज्ज आहे, ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल अॅनलॉग स्पीडोमीटर, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि इतर फीचर्सचा समावेश आहे. सणांच्या निमित्ताने नवीन मॉडेल लाँच केल्याने विक्री वाढण्यास मदत होईल. (Hero Pleasure Plus Xtec Price Gets New Features Digital Analog Speedometer With Bluetooth Connectivity)

Hero MotoCorp ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना भुरळ घालण्यासाठी Pleasure+ Xtec वर मोठी बाजी लावत आहे. तसेच, सेगमेंटमधील इतर स्कूटरशी स्पर्धा लक्षात घेऊन कंपनीने नवीन स्कूटरमधील फीचर्समध्ये वाढ केली आहे. उदाहरणार्थ, डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर आता कॉल आणि एसएमएस अलर्ट सारख्या फंक्शन्ससह येतो. या नवीन स्कूटरमध्ये I3S टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, ज्यात आयडल-स्टॉप-स्टार्ट सिस्टमची फीचर्स आहेत.

Hero MotoCorp ने ही स्कूटर अशा प्रकारे तयार केली आहे की, ती ग्राहकांच्या मोठ्या गटाला आकर्षित करू शकेल. Hero MotoCorp चे सेल्स अँड आफ्टरसेल्सचे प्रमुख नवीन चौहान म्हणाले, "आयकॉनिक प्लेझर ब्रँडची ग्राहकांसोबत मजबूत पकड आहे. अनेक पहिल्या-सेगमेंट फीचर्ससह, नवीन प्लेझर+ 'एक्सटेक' आमच्या स्कूटर पोर्टफोलिओला बळकट करेल. तरुणांना खूप आनंद देईल."

लूक आणि डिझाइन कशी आहे?Hero MotoCorp च्या या नवीन स्कूटरमध्ये प्रोजेक्टर हेड लाइट देण्यात आला आहे, जो या सेगमेंटमधील कोणत्याही स्कूटरमध्ये पहिल्यांदा दिला आहे. कंपनीचा असा दावा आहे की, प्रोजेक्टर हेड लाइट लांब आणि विस्तीर्ण पोहोच आणि अँटी-फॉग फीचर्ससह 25 टक्के अधिक लाइटची तीव्रता प्रदान करतो. 

याशिवाय, स्कूटरला मिरर, मफलर प्रोटेक्टर, हँडल बार, सीट बॅकरेस्ट आणि फेंडर स्ट्राइपवर क्रोम फिनिश देण्यात आले आहे. सीट ड्युअल टोन कलरसह आली आहे, तर आतील पॅनेल कलर्ड आहे. प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी सीट बॅकरेस्टमध्ये सुधारणा केली गेली आहे, तर मेटल फ्रंट फेंडर्स अधिक टिकाऊ असल्याचा दावा केला जात आहे.

इंजिन आणि पॉवरHero Pleasure+XTec स्कूटरला 110cc बीएस -6 इंजिन मिळते. हे इंजिन 7000 rpm वर 8 bhp पॉवर आणि 5500 rpm वर 8.7 Nmचा टॉर्क जनरेट करते.

कलर ऑप्शनHero Pleasure + Xtec ला सात कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. 

किती आहे किंमत?कंपनीने भारतीय बाजारात Hero Pleasure+ XTec ची किंमत LX व्हेरिएंटसाठी 61,000 रुपये आणि Pleasure + 110 XTec व्हेरिएंटसाठी 69,500 रुपये किंमत निश्चित केली आहे.

टॅग्स :Automobileवाहनhero moto corporationहिरो मोटो कॉर्प