मार्चमध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणणार Hero, प्रतिस्पर्धी कंपन्यांसमोर असणार तगडं आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 10:31 AM2022-01-03T10:31:42+5:302022-01-03T10:32:16+5:30

Hero Motocorp : स्प्लेंडरसारखी दमदार बाइक बनवणाऱ्या या कंपनीने सांगितले की, इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पाचे काम सुरू झाले असून हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

Hero Motocorp to launch its first battery powered electric scooter in march | मार्चमध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणणार Hero, प्रतिस्पर्धी कंपन्यांसमोर असणार तगडं आव्हान!

मार्चमध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणणार Hero, प्रतिस्पर्धी कंपन्यांसमोर असणार तगडं आव्हान!

Next

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती क्रेझ पाहता आता कंपनी मार्च 2022 मध्ये आपली पहिली बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. या वृत्ताला कंपनीने काही महिन्यांपूर्वीच दुजोरा दिला होता. स्प्लेंडरसारखी दमदार बाइक बनवणाऱ्या या कंपनीने सांगितले की, इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पाचे काम सुरू झाले असून हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील चित्तूर प्लांटमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे उत्पादन केले जाऊ शकते.

गेल्या वर्षी कंपनीने पहिल्यांदाच आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची झलक दाखवली होती. याशिवाय, एप्रिल 2021 मध्ये हिरोने आपल्या ई-स्कूटरसह बॅटरी स्वॅप टेक्नॉलॉजी आणि इतर अनेक फीचर्स देण्यासाठी तैवानची टेक कंपनी गोगोरोसोबत भागिदारी केली आहे. पहिली हीरो ई-स्कूटर सिंगल-साइड स्विंगआर्म, फुल-एलईडी लाइटिंग, फास्ट चार्जिंग, लांब रेंज आणि बॅटरी सेपरेशनसह ऑफर केली जाणार आहे.

हिरो इलेट्रिक स्कूटर लाँच केल्यानंतर भारतात या स्कूटरसोबत मजबूत स्पर्धा पाहायला मिळेल. मात्र, सर्वात महत्त्वाची स्पर्धा बजाज चेतक इलेक्ट्रिक, ओला एस 1 आणि एस 1 प्रो, एथर 450 एक्स, टीव्हीएस आयक्यूब आणि अशा अनेक कंपन्या आणि स्टार्टअप्सच्या स्कूटर्ससोबत असणार आहे. स्पर्धेनुसार या ई-स्कूटरची किंमत जवळपास एक लाख रुपये असू शकते.

हिरो मोटोकॉर्पने केवळ भारतातच नाही तर परदेशातही खूप काही करायला सुरुवात केली आहे, ज्यात आशिया, आफ्रिका, दक्षिण आणि मध्य अमेरिकेसह कॅरिबियन प्रदेशाचा समावेश आहे. कंपनीने गेल्यावर्षी टू-व्हीलर निर्यातीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून 2021 मध्ये कंपनीच्या निर्यातीत 71 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हिरो मोटोकॉर्पने गेल्या वर्षी एकूण 2.89 लाख टू-व्हीलर्सची निर्यात केली आहे, हा खूप मोठा आकडा आहे. 2020 मध्ये निर्यातीचा हा आकडा 1.69 लाखांवर होता. 

Web Title: Hero Motocorp to launch its first battery powered electric scooter in march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.