शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Hero Motocorp च्या पहिल्या Electric Scooter ची लाँच डेट आली समोर, पाहा कधी करता येणार बुक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:52 PM

देशातील सर्वात मोठी टू व्हिलर कंपनी हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) आपल्या पहिल्या इलेक्ट्रीक स्कूटरच्या (electric scooter) लाँचसाठी तयार झाल्याचं दिसत आहे.

देशातील सर्वात मोठी टू व्हिलर कंपनी हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) आपल्या पहिल्या इलेक्ट्रीक स्कूटरच्या (electric scooter) लाँचसाठी तयार झाल्याचं दिसत आहे. आतापर्यंत कंपनीनं याची अधिकृत घोषणा केली नसली तरी काही रिपोर्ट्सनुसार ही स्कूटर कधी लाँच होण्याची शक्यता आहे, याची माहिती समोर आलीये. नव्या रिपोर्ट्सनुसार या इलेक्ट्रीक स्कूटरला विदा (Vida) या ब्रँड अंतर्गत लाँच केलं जाणार आहे. ही स्कूटर यापूर्वी मार्च महिन्यात लाँच होणार होती. परंतु कंपनीनं हे लाँच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

एका रिपोर्टनुसार हिरोची ही इलेक्ट्रीक स्कूटर आंध्र प्रदेशातील चित्तूर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये तयार केली जात आहे. कंपनीने गेल्या वर्षीच या इलेक्ट्रीक स्कूटरचा टीझर शेअर केला होता. जुलैमध्ये लाँच केल्यानंतर त्याची डिलिव्हरी या वर्षाच्या अखेरीस होईल, असं म्हटलं जात आहे. सर्वत्रच एकत्र या इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री सुरू केली जाईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. हीरो ई-स्कूटरची विक्री युरोप आणि लॅटिन अमेरिकेतही केली जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. भारतीय बाजारपेठेत आधीपासून उपस्थित त्असलेल्या TVS iCube, Bajaj Czech Electric, Ola S1 सोबत या स्कूटरची स्पर्धा असेल असंही मानलं जातंय.

चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयारHero MotoCorp आणि Bharat Petroleum Corporation Limited यांनी संयुक्त विद्यमानं देशभरातील इलेक्ट्रीक दुचाकींसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे. हिरोच्या भारत पेट्रोलियमसोबतच्या सहकार्यानुसार, दोन्ही कंपन्या पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि बंगळुरूपासून सुरू होणाऱ्या नऊ शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत. यानंतर देशभरातील इतर शहरांमध्ये त्याचा विस्तार केला जाईल. पहिल्या दोन शहरांमध्ये मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास लवकरच सुरू होईल आणि प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर डीसी आणि एसी चार्जर्ससह अनेक चार्जिंग पॉइंट असतील. ते सर्व दुचाकींसाठी उपलब्ध असतील असंही कंपनीचं म्हणणं आहे.

प्रीमिअम प्रोडक्टवरही कामकंपनीचे CFO निरंजन गुप्ता यांच्या मते, इलेक्ट्रीक उत्पादनांव्यतिरिक्त, Hero MotoCorp प्रीमियम पोर्टफोलिओमध्ये अधिकाधिक उत्पादने लाँच करण्यावर देखील काम करत आहे. जे सेगमेंटमधील दुचाकी उत्पादकांच्या मार्केट शेअरला चालना देईल. Hero MotoCorp एथर एनर्जी आणि गोगोरो या दोन कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक कायम ठेवणार असल्याची माहितीही गुप्ता यांनी दिली.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरhero moto corporationहिरो मोटो कॉर्प