Hero Motocorp च्या पहिल्या Electric Scooter ची लाँच डेट आली समोर, पाहा कधी करता येणार बुक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:52 PM2022-04-26T12:52:30+5:302022-04-26T12:52:53+5:30

देशातील सर्वात मोठी टू व्हिलर कंपनी हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) आपल्या पहिल्या इलेक्ट्रीक स्कूटरच्या (electric scooter) लाँचसाठी तयार झाल्याचं दिसत आहे.

hero motocorp first electric scooter new details revealed may launch in july continue investment on ather anergy bharat petroleum Electric charging points | Hero Motocorp च्या पहिल्या Electric Scooter ची लाँच डेट आली समोर, पाहा कधी करता येणार बुक?

Hero Motocorp च्या पहिल्या Electric Scooter ची लाँच डेट आली समोर, पाहा कधी करता येणार बुक?

Next

देशातील सर्वात मोठी टू व्हिलर कंपनी हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) आपल्या पहिल्या इलेक्ट्रीक स्कूटरच्या (electric scooter) लाँचसाठी तयार झाल्याचं दिसत आहे. आतापर्यंत कंपनीनं याची अधिकृत घोषणा केली नसली तरी काही रिपोर्ट्सनुसार ही स्कूटर कधी लाँच होण्याची शक्यता आहे, याची माहिती समोर आलीये. नव्या रिपोर्ट्सनुसार या इलेक्ट्रीक स्कूटरला विदा (Vida) या ब्रँड अंतर्गत लाँच केलं जाणार आहे. ही स्कूटर यापूर्वी मार्च महिन्यात लाँच होणार होती. परंतु कंपनीनं हे लाँच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

एका रिपोर्टनुसार हिरोची ही इलेक्ट्रीक स्कूटर आंध्र प्रदेशातील चित्तूर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये तयार केली जात आहे. कंपनीने गेल्या वर्षीच या इलेक्ट्रीक स्कूटरचा टीझर शेअर केला होता. जुलैमध्ये लाँच केल्यानंतर त्याची डिलिव्हरी या वर्षाच्या अखेरीस होईल, असं म्हटलं जात आहे. सर्वत्रच एकत्र या इलेक्ट्रीक स्कूटरची विक्री सुरू केली जाईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. हीरो ई-स्कूटरची विक्री युरोप आणि लॅटिन अमेरिकेतही केली जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. भारतीय बाजारपेठेत आधीपासून उपस्थित त्असलेल्या TVS iCube, Bajaj Czech Electric, Ola S1 सोबत या स्कूटरची स्पर्धा असेल असंही मानलं जातंय.

चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार
Hero MotoCorp आणि Bharat Petroleum Corporation Limited यांनी संयुक्त विद्यमानं देशभरातील इलेक्ट्रीक दुचाकींसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे. हिरोच्या भारत पेट्रोलियमसोबतच्या सहकार्यानुसार, दोन्ही कंपन्या पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि बंगळुरूपासून सुरू होणाऱ्या नऊ शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहेत. यानंतर देशभरातील इतर शहरांमध्ये त्याचा विस्तार केला जाईल. पहिल्या दोन शहरांमध्ये मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास लवकरच सुरू होईल आणि प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर डीसी आणि एसी चार्जर्ससह अनेक चार्जिंग पॉइंट असतील. ते सर्व दुचाकींसाठी उपलब्ध असतील असंही कंपनीचं म्हणणं आहे.

प्रीमिअम प्रोडक्टवरही काम
कंपनीचे CFO निरंजन गुप्ता यांच्या मते, इलेक्ट्रीक उत्पादनांव्यतिरिक्त, Hero MotoCorp प्रीमियम पोर्टफोलिओमध्ये अधिकाधिक उत्पादने लाँच करण्यावर देखील काम करत आहे. जे सेगमेंटमधील दुचाकी उत्पादकांच्या मार्केट शेअरला चालना देईल. Hero MotoCorp एथर एनर्जी आणि गोगोरो या दोन कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक कायम ठेवणार असल्याची माहितीही गुप्ता यांनी दिली.

Web Title: hero motocorp first electric scooter new details revealed may launch in july continue investment on ather anergy bharat petroleum Electric charging points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.