शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

Hero ची कमाल; एकाच महिन्यात केली ७ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 1:08 PM

हीरो इलेक्ट्रीकनं (Hero Electric) गेल्या महिन्यात मोठी कमाल केली आहे. नोव्हेंबर महिन्यात ७ हजारांपेक्षा अधिक गाड्यांची विक्री केली आहे.

Hero Electric Scooters : हीरो इलेक्ट्रीकनं (Hero Electric) गेल्या महिन्यात मोठी कमाल केली आहे. देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक दुचाकी कंपनी हीरो इलेक्ट्रीकनं नोव्हेंबर महिन्यात ७ हजारांपेक्षा अधिक गाड्यांची विक्री केली आहे. JMK रिसर्च आणि VAHAAN डॅशबोर्डच्या एका रिपोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. हीरो इलेक्ट्रीकनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ११६९ गाड्यांची विक्री केली होती.या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे आणि कंपनी ही मागणी पूर्णदेखील करणार आहे. सरकारकडूनही सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीची मागणीही वाढत आहे. सणासुदीच्या काळामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनी सिटी-स्पीड कॅटेगरीमध्ये उत्तम कामगिरी करत असल्याचं हीरो इलेक्ट्रीकनं म्हटलं आहे. सरकारच्या प्रयत्नांना यश“आम्ही भारतात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरात तेजी पाहत आहोत. आम्हाला इलेक्ट्रीक मोबिलिटी सोल्युशन्सकडे एक मजबूत कन्झुमर कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय, सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि ग्राहकांसाठीच्या धोरणांमुळे कंपनीच्या वाहनांची मागणी वाढली आहे. इलेक्ट्रीक वाहनाच्या वाढत्या विक्रीदरम्यान आम्ही मागणीही पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहोत. चांगल्या कामगिरीसह आम्ही हे वर्ष पूर्ण करू,” असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंदर गिल यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनIndiaभारत