शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Hero Electric Photon ची रेंज 108 किमी; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि टॉप स्पीड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 15:57 IST

Hero Electric Photon : कमी बजेट आणि लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सध्याच्या रेंजपैकी एक म्हणजे हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ( Hero Electric Photon) जी कमी किंमत, स्टाईल, फीचर्स आणि लांब रेंजमुळे बाजारात यश मिळवत आहे.

नवी दिल्ली : देशातील दुचाकी क्षेत्रात इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकची (Electric Scooter and Bike) रेंज खूप मोठी झाली आहे, ज्यामध्ये विविध किंमती आणि फीचर्ससह ई-स्कूटर आणि बाईक सहज मिळत आहेत. कमी बजेट आणि लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सध्याच्या रेंजपैकी एक म्हणजे हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ( Hero Electric Photon) जी कमी किंमत, स्टाईल, फीचर्स आणि लांब रेंजमुळे बाजारात यश मिळवत आहे.

जर तुम्हाला ही स्कूटर आवडली असेल आणि तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही हिरो इलेक्ट्रिक फोटॉनची किंमत, फीचर्स, रेंज, स्पेसिफिकेशनसह प्रत्येक माहिती देत आहोत. कंपनीने हिरो इलेक्ट्रिक फोटॉनची सुरुवातीची किंमत 80,790 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह बाजारात आणली आहे. ऑन-रोड असताना ही एक्स-शोरूम किंमत 84,566 रुपये आहे.

बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 1.87 kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. या बॅटरीसोबत 1200 W पॉवरची BLDC मोटर जोडलेली आहे. कंपनीच्या मते, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक 5 तासांत पूर्ण चार्ज होतो. कंपनी या बॅटरी पॅकवर 3 वर्षांची वॉरंटी देखील देते. हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 108 किलोमीटरची रेंज देते. या रेंजसह, कंपनीने 45 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड मिळवण्याचा दावा केला आहे.

काय आहेत फीचर्स?हिरो इलेक्ट्रिक फोटॉनला कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे, ज्यामध्ये स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत. सस्पेन्शन सिस्टीममध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ड शॉक अब्जॉर्बर सिस्टम देण्यात आली आहे.  या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर कंपनीने डिजिटल क्लॉक, डिजिटल स्पीडोमीटर, रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म, पास स्विच, ईबीएस, डीआरएल, लो बॅटरी इंडिकेटर, बॅटरी स्पायिंग यांसारखे फीचर्स दिले आहेत.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईकAutomobileवाहन