भारतात Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी Harley-Davidson आणणार नवी बाइक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 15:25 IST2018-07-31T15:23:48+5:302018-07-31T15:25:01+5:30
Harley-Davidson ची ही नवीन बाइक बाजारात आल्यास या बाइकची स्पर्धा Royal Enfield सोबत होणार आहे. पण Harley-Davidson ही कंपनी यासाठी कोणत्या भारतीय कंपनीची मदत घेणार की नाही याची माहिती मिळाली नाहीये.

भारतात Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी Harley-Davidson आणणार नवी बाइक
(Image Credit : www.motorbeam.com)
नवी दिल्ली : अमेरिकेतील जगप्रसिद्ध बाइक तयार करणारी कंपनी Harley-Davidson भारतासह आशियातील इतरही मार्केटसाठी नवीन स्ट्रॅटेजी तयार करत आहे. Harley-Davidson 250-500CC बाइक डेव्हलप करण्याचा विचार करत आहे. Harley-Davidson ची ही नवीन बाइक बाजारात आल्यास या बाइकची स्पर्धा Royal Enfield सोबत होणार आहे. पण Harley-Davidson ही कंपनी यासाठी कोणत्या भारतीय कंपनीची मदत घेणार की नाही याची माहिती मिळाली नाहीये.
कंपनीने सांगितले की, आम्ही आशिया मार्केटमध्ये 250-500CC बाइक लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनी दोन वर्षांत एका दुसऱ्या कंपनीसोबत स्ट्रॅटेटिक अलायन्स करण्याचा विचार करत आहे. कंपनी पुढील दोन वर्षात भारत आणि आशियातील मार्केटमध्ये बाइक लॉन्च करण्यातचा विचार करत आहे.
कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, भारत आणि आशियातील इतर मार्केटमध्ये प्रिमियम प्रॉडक्टवर ग्राहक फार विचार करुन खर्च करतात. भारताचं 250-500CC चं बाइक सेगमेंट २०२१ पर्यंत २५ टक्के वाढू शकतं. आम्हाला आशियाई मार्केटमध्ये स्ट्रॅटेजिक अलायन्ससह उतरायचं आहे. आम्हाला आमचा ब्रॅन्ड आणि व्हॉल्यूम वाढवायचा आहे.
भारतात Harley-Davidson बाइकची विक्री घटली
भारतात Harley-Davidson बाइकची विक्री कमी होत आहे. २०१८ मध्ये कंपनीचे सेल्स ७ टक्क्यांनी खाली आले आहेत. २०१८ मध्ये कंपनीने केवळ ३, ४१३ यूनिट्स विकले आहेत.