३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 11:48 IST2025-09-23T11:46:18+5:302025-09-23T11:48:21+5:30

GST on KTM, Triumph, Aprilia Bike: जीएसटी कपात २२ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. वाहनांचे दर धडाधड उतरले आहेत. परंतू, काही वाहनांचे दर वाढले आहेत.

GST on motorcycles above 350 cc increased; KTM, Triumph and Aprilia took a big decision..., kept price same, not increased | ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...

३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...

जीएसटी कपात २२ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. वाहनांचे दर धडाधड उतरले आहेत. परंतू, काही वाहनांचे दर वाढले आहेत. यात ३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या मोटरसायकलचा समावेश आहे. अशातच केटीएम, ट्रायम्फ आणि एप्रिलियाच्या देखील मोटरसायकलचे दर वाढणार होते. परंतू, या कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

जीएसटी कमी होण्याच पहिला दिवस, डीमार्टने जुनेच दराचे स्टीकर लावलेले... कोणत्या वस्तू कोणत्या जीएसटी स्लॅबमध्ये... 

या कंपन्यांनी जीएसटी वाढला तरी आपल्या मोटरसायकलच्या किंमती न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा वाढीव भार या कंपन्या स्वत:वरच घेणार आहेत. यामुळे या बाईक्स ग्राहकांना जुन्याच किंमतीत मिळणार आहेत. 

KTM ने आपल्या 390cc बाईक्सच्या किमती वाढवल्या नाहीत. तसेच, Triumph ने आपल्या 400cc मॉडेल्सच्या किमतीही स्थिर ठेवल्या आहेत. याशिवाय, Piaggio India ने देखील Aprilia Tuono 457 ची किंमत कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे, Aprilia ने त्यांच्या Aprilia RS457 या मॉडेलवर जीएसटी वाढीचा परिणाम कमी करण्यासाठी सूट देण्याची घोषणा केली आहे. कंपन्यांनी स्वतःच जीएसटी वाढीचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

असे करता येते का?
जीएसटी वाढला  किंवा कमी झाला तरी कंपन्या किंमतीत खेळ करून कोणत्याही उत्पादनाची किंमत तीच कायम ठेवू शकतात. उदा. ट्रायम्फची बाईक ज्याची एक्स शोरुम किंमत २.०६ लाख आहे. त्यावरील जीएसटी आदी मिळून जर कंपनीला तीच किंमत ठेवायची असेल तर कंपनी एक्सशोरुम किंमत कमी करू शकते आणि २.०६ लाख रुपये ही किंमत मॅनेज करू शकते. तसेच गणित दर कमी झाला आणि जर तीच किंमत ठेवायची असेल तर त्याचे आहे. कंपन्या आपल्या उत्पादनाची जेवढी जीएसटीमध्ये रक्कम कमी होते तेवढी वाढवून दाखवू शकतात. बऱ्याच कंपन्यांनी या जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याची भुमिका घेतलेली आहे.

Web Title: GST on motorcycles above 350 cc increased; KTM, Triumph and Aprilia took a big decision..., kept price same, not increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.