- हेमंत बावकर
गेल्या २२ सप्टेंबरपासून देशभरात जीएसटीमध्ये मोठी कपात लागू झाली आहे. याचा फायदा असा झाला की दोन दिवसांत मारुती, टाटा, हुंदाई सारख्या कंपन्यांनी ५० हजार हून अधिक गाड्या विकल्या आहेत. छोट्या कारच्या किंमती ४० हजारापासून ते दीड-दोन लाखांपर्यंत कमी झाल्या आहेत. हा फायदा तर आहेच, परंतू या किंमती कमी झाल्याने नवीन वाहन घेणाऱ्यांना आणखी एक मोठा फायदा झाला आहे.
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
वाहनाच्या किंमतीत एक्स शोरुम, इन्शुरन्स आणि आरटीओ कर यांचा अंतर्भाव असतो. एक्स शोरुम किंमत कमी झाल्याने त्याचा फायदा हा आरटीओच्या करात देखील होणार आहे. एक्स शोरुम किंमतीचा आणि आरटीओ कराचा थेट संबंध असतो. तसाच फायदा इन्शुरन्समध्ये देखील होणार आहे.
वाहनाची आयडीव्ही कमी झाल्याने इन्शुरन्ससाठी आकारली जाणारी रक्कम कमी झाली आहे. हा फायदा कमी की काय म्हणून आरटीओला जी रजिस्ट्रेशनवेळी रक्कम द्यावी लागते त्यातही आता कपात होणार आहे. कसे ते पाहुयात...
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
आरटीओशी संबंधित सुत्रांनुसार पेट्रोल वाहनावर १३ टक्के कर आकारला जातो. डिझेल वाहनावर १४ टक्के आणि सीएनजी वाहन असेल तर ८.५० टक्के आरटीओ टॅक्स आकारला जातो. हा कर वाहनाच्या एक्स शोरुम किंमतीवर आकारला जातो. जर वाहनाची किंमतच कमी झाली तर आपसूकच आरटीओ टॅक्सटी रक्कमही कमी होणार आहे. असाच आरटीओ कर दुचाकींवर देखील कमी होणार आहे. 99cc ते 299cc च्या दुचाकींवर ११ टक्के कर घेतला जातो.
उदाहरण घ्यायचे झाल्यास मारुतीची डिझायरची जुनी किंमत जर ८ लाखांना एक्स शोरुम असेल आणि जर जीएसटी कपातीमुळे ही किंमत १ लाखाने कमी झाली असेल तर त्या एक लाखावरील पेट्रोल व्हेरिअंटचा कर १३००० हजारांनी कमी होणार आहे. सीएनजी व्हेरिअंटवरील कर हा ८.५० टक्के म्हणजेच ८५०० रुपयांनी कमी होणार आहे. तर त्याच किंमतीच्या दुसऱ्या डिझेल कारवरील आरटीओ कर १४००० रुपयांनी कमी होणार आहे. जीएसटीमुळे एक्स शोरुम किंमतीत कपात, इन्शुरन्समध्ये कपात आणि नंतर आरटीओ करात कपात असा तिहेरी फायदा होणार आहे.