जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:31 IST2025-09-30T12:30:10+5:302025-09-30T12:31:36+5:30
GST Rate cut: केंद्र सरकारने केलेल्या जीएसटी दरांच्या सुधारणेनंतर (GST reforms) कंपनीने या बाईकची किंमत तब्बल ₹१५,००० रुपयांनी कमी केली आहे.

जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
दुचाकीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) आपली लोकप्रिय स्ट्रीटफायटर बाईक, होंडा CB300F, आता अधिक स्वस्त केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या जीएसटी दरांच्या सुधारणेनंतर (GST reforms) कंपनीने या बाईकची किंमत तब्बल ₹१५,००० रुपयांनी कमी केली आहे. आता ही बाईक भारतीय बाजारात ₹१.५५ लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
या बाईकला सुरुवातीला ₹२.२९ लाख (एक्स-शोरूम) च्या उच्च किंमतीवर लाँच करण्यात आले होते, परंतु कमी प्रतिसादामुळे नंतर कंपनीने तिची किंमत कमी करून ₹१.७० लाख केली होती. आता जीएसटीतील बदलांमुळे मिळालेला फायदा कंपनीने ग्राहकांना दिला असून, त्यामुळे ही बाईक आपल्या सेगमेंटमधील सर्वात किफायतशीर बाईकपैकी एक बनली आहे.
होंडा CB300F ची प्रमुख वैशिष्ट्ये:
इंजिन आणि पॉवर: या बाईकमध्ये २९३.५२ सीसी क्षमतेचे, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन २४.४७ पीएसची कमाल पॉवर आणि २५.६ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
डिझाइन: CB300F ला एक मस्क्युलर आणि स्पोर्टी लुक देण्यात आला आहे. एलईडी हेडलाइट, आकर्षक टेल लाइट आणि फ्यूल टँकचे डिझाइन बाईकला एक आक्रमक स्ट्रीटफायटरचा लुक देते.
मायलेज आणि परफॉर्मन्स: कंपनीनुसार, ही बाईक सुमारे ३० किमी प्रति लीटर मायलेज देते. परंतु, काही राइडर्सच्या मते, हायवेवर ती ५० किमी प्रति लीटरपेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. तिचा टॉप स्पीड १६० किमी प्रति तास आहे.
फीचर्स: यात ड्युअल-चॅनेल एबीएस, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसडी (अपसाइड-डाउन) फ्रंट फोर्क आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेंशन सारखे आधुनिक फीचर्स आहेत. तसेच, बाईकचे वजन कमी असल्याने ती हाताळायला सोपी आहे.
फ्लेक्स-फ्यूल मॉडेल: ही बाईक स्टँडर्ड पेट्रोलसह फ्लेक्स-फ्यूल (E85 इंधनावर चालणारी) व्हेरिएंटमध्येही उपलब्ध आहे, आणि दोन्ही व्हेरिएंटची किंमत सारखीच आहे.