वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 00:00 IST2025-09-03T23:58:50+5:302025-09-04T00:00:54+5:30
GST Council Rate Cuts Car, Scooter: अनेक वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. छोट्या वाहनांवरील कर दरही कमी करण्यात आले आहेत.

वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
जीएसटीच्या दरांमध्ये कपात केल्याने अनेकांचे वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण अनेक वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. छोट्या वाहनांवरील कर दरही कमी करण्यात आले आहेत. यामध्ये ३५० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या मोटारसायकल, तीनचाकी वाहने आणि १२००-१५०० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या लहान कारवर १८ टक्के जीएसटी लागणार आहे.
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच...
महत्वाचे म्हणजे बस, ट्रक आणि रुग्णवाहिका यांसारखी मोठी वाहने देखील १८% स्लॅबमध्ये येणार आहेत. याचा फायदा टाटा, आयशर, अशोक लेलँडसारख्या कंपन्यांना होणार आहे. वेगवेगळे कर असलेले ऑटो पार्ट्स आता १८% जीएसटीखाली येणार आहेत. ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारसायकली आणि वैयक्तिक वापरासाठी विमानांवर ४०% जीएसटी लावला जाणार आहे.
कारचे काय...
कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन असे दोन प्रकार ठेवण्यात आले आहेत. यानुसार १२०० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या पेट्रोल आणि १५०० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या डिझेल इंजिनच्या सर्व कारवर ४०% जीएसटी लागणार आहे. म्हणजेच पेट्रोल कार घ्यायची असेल तर १२०० सीसीपेक्षा कमी आणि डिझेल कार घ्यायची असेल तर १५०० सीसीपेक्षा कमी घेतली तरच तुम्हाला जीएसटी कपातीला लाभ होणार आहे.