आजपासून संपूर्ण देशभरात नवा जीएसटी 2.0 स्लॅब अथवा कर संरचना लागू झाली आहे. याचा थेट परिणाम वाहन बाजारात दिसत आहे. कार कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा देणाऱ्या नव्या किंमती जाहीर केल्या आहेत. मारुती सुझुकी, रेनॉ आणि टाटा मोटर्ससह सर्व आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, मारुती सुझुकीच्या एरिना आणि नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणाऱ्या सर्वच मॉडेल्सच्या किंमतीत मोठा बदल झाला असून, एस-प्रेसो आता देशातील सर्वात स्वस्त कार ठरली आहे.
मारुती कारच्या किंमतीतील नवा बदल असा -- एस-प्रेसो : नवीन एक्स-शोरूम किंमत आता 3.49 लाख रुपयांवर आली आहे.- ऑल्टो K10 STD (O) : या कारची किंमत 4.23 लाखांवरून 3.69 लाख रुपयांवर आली आहे. अर्थात ही कार खरेदी करणाऱ्यांना तब्बल 53100 रुपयांचा फायदा होईल.- या कारच्या किंमतीतील वरील बदल बघता, एस-प्रेसो ही ऑल्टोच्या तुलनेत 20 हजार रुपयांनी स्वस्त ठाली आहे. अर्थात, आता एस-प्रेसो ही कंपनीची एंट्री-लेव्हल कार बनली आहे.
रेनॉ क्विडमध्येही घट -नव्या जीएसटीमुळे रेनॉच्या लोकप्रिय हॅचबॅक क्विड 1.0 RXE ची किंमत ४.६९ लाखांवरून ४.२९ लाख रुपये झाली आहे. ग्राहकांना जवळपास ४०,००० रुपयांची बचत होत आहे.
टाटा मोटर्सचाही मोठा दिलासा -टियागो XE ची किंमत आता ४.५७ लाख रुपयांवर आली आहे. या कारची किंमत आता तब्बल ४२,५०० रुपयांनी कमी झाली आहे. तर नेक्सॉनची किंमत सर्वाधिक १.५५ लाख रुपयांनी कमी झाली आहे. आता या कारची सुरुवातीची किंमत ७.३१ लाख रुपये झाली आहे. महत्वाचे म्हमजे या कारवर ग्राहकांना ४५,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त लाभही दिला जात आहे.