शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

गुगल मॅपच सांगेल किती भरायचा टोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:14 AM

प्रवाशांच्या मार्गातील सर्व टोल गेट्सची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होईल. त्यातून प्रवासादरम्यान लागणाऱ्या टोलची माहिती प्रवाशांना प्रवास सुरू करायच्या आधीच मिळेल .

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गुगल मॅप प्रवाशांच्या सोयीसाठी काही नवे फीचर आपल्या ॲपला जोडत असून, प्रवासादरम्यान रस्त्यावर प्रवाशांना किती टोल भरावा लागू शकेल, याच्या माहितीचा त्यात समावेश असणार आहे. 

सूत्रांनी सांगितले की, या सुविधेमध्ये प्रवाशांच्या मार्गातील सर्व टोल गेट्सची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होईल. त्यातून प्रवासादरम्यान लागणाऱ्या टोलची माहिती प्रवाशांना प्रवास सुरू करायच्या आधीच मिळेल. टोल गेट्सचा मार्ग स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेणे प्रवाशांना त्यामुळे सोयीचे होईल. त्यामुळे ही सुविधा प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे फीचर सर्वच देशांत उपलब्ध असेल का, याची माहिती मात्र तात्काळ उपलब्ध होऊ शकली नाही. 

नव्या सुविधेबाबत गुगलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तथापि, ‘ॲण्ड्रॉइड पोलीस’ने गुगल मॅप प्रीव्ह्यू प्रोग्रामच्या एका सदस्याच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. आगामी फीचरची माहिती देणारा एक मेल गुगल मॅप प्रीव्ह्यू प्रोग्रामच्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आला आहे. आगामी काळात गुगल मॅपवर रस्त्यावरील सर्व टोलचे मूल्य, पूल आणि इतर मूल्य वर्धने उपलब्ध होतील. प्रवाशांनी ॲपवर प्रवासाचा मार्ग निवडताच ही माहिती त्यास उपलब्ध होईल.

वेझ ॲपकडून उचलले नवे फीचरसूत्रांनी सांगितले की, मॅपिंग ॲप वेझकडून हे फीचर गुगलने उचलले आहे. गुगलने २०१३ मध्ये वेझचे अधिग्रहण केले होते. या ॲपवर टोलची माहिती उपलब्ध होती.  ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका यांसह काही मोजक्या देशांत वेझची सेवा आहे. गुगल मॅपकडून तिचा विस्तार केला जाणार आहे. 

टॅग्स :tollplazaटोलनाका