इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! FAME II योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 12:45 PM2024-02-12T12:45:23+5:302024-02-12T12:47:31+5:30

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Good news for electric vehicle buyers The government has taken a big decision regarding the FAME II scheme | इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! FAME II योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! FAME II योजनेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहने (FAME) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आर्थिक आउटलेट १,५०० कोटी रुपयांवरून ११,५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे. FAME 2 सबसिडी योजना २०१९ मध्ये आणली, जी आतापर्यंत फक्त १०,००० कोटी रुपये होती, ती या वाढीनंतर ११,५०० कोटी रुपये झाली आहे. याचा थेट फायदा इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना होणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२४ पर्यंतच लागू राहील.

National Pension System: NPS अकाऊंट फ्रिज झालाय का? जाणून घ्या अ‍ॅक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत

सरकारने FAME II योजनेसह १० लाख इलेक्ट्रिक दुचाकी, ५ लाख इलेक्ट्रिक तीनचाकी आणि ५५,००० इलेक्ट्रिक प्रवासी कार तसेच ७,००० इलेक्ट्रिक बसेसना आर्थिक सहाय्य देण्याची योजना आखली आहे. ३१ जानेवारीपर्यंत या योजनेंतर्गत १३.४१ लाख इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना एकूण ५,७९० कोटी रुपयांची सबसिडी देण्यात आली आहे. यामध्ये ११.८६ लाख दुचाकी, १.३९ लाख तीनचाकी आणि १६,९९१ चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, सरकारने तेल कंपन्यांना ७,४३२ इलेक्ट्रिक वाहन सार्वजनिक चार्जिंग स्टेशनसाठी ८०० कोटी रुपयांची भांडवली सबसिडी मंजूर केली आहे आणि विविध शहरे, राज्य परिवहन उपक्रम आणि राज्य सरकारी संस्थांना इंट्रासिटी वाहतुकीसाठी ६,८६२ इलेक्ट्रिक बसेससाठी मंजुरी दिली आहे. 

या नवीन सुधारित आउटलेटनंतर, अनुदानासाठी ७,०४८ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत, त्यापैकी दुचाकी वाहनांना ५,३११ कोटी रुपये मिळतील. इलेक्ट्रिक बसेस आणि चार्जिंग स्टेशन्स बसवण्यासाठी एकूण अनुदान ४,०४८ कोटी रुपये करण्यात आले आहे.

FAME II ची मुदत कधी पर्यंत?

FAME II सबसिडी ही मुदत-मर्यादित योजना आहे जी ३१ मार्च २०२४ पर्यंत किंवा निधी शिल्लक असे पर्यंत लागू असेल. गेल्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी FAME योजनेसाठी २,६७१ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, फेम सबसिडीची मुदत वाढवण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील रक्कम अर्थसंकल्पादरम्यान पुढील आर्थिक वर्षापर्यंत वाढवण्यात आल्याने सरकार फेम २ अनुदान योजना पुढे नेऊ शकते, असे संकेत मानले जात आहेत.

देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणि विक्री झपाट्याने वाढत आहे, यात दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांच्या विभागात मागणी आहे. इलेक्ट्रिक वाहनांची एकूण विक्री २०२२ मध्ये १.०२ मिलियन वरून २०२३ मध्ये १.५३ मिलियन युनिट्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, सरकारने FAME 2 सबसिडीचा तिसरा टप्पा पुढे नेल्यास उद्योगाच्या वाढीस आणखी मदत होईल, असा विश्वास इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला आहे.फेम 2 योजनेची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपणार आहे.

Web Title: Good news for electric vehicle buyers The government has taken a big decision regarding the FAME II scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.