गोदावरी इलेक्ट्रीक मोटर्सचा पुण्यात पहिला शोरुम; ई-रिक्षा, सायकल विकणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 16:51 IST2023-01-25T16:50:52+5:302023-01-25T16:51:03+5:30

महाराष्ट्रातील पहिल्या शोरूमच्या उद्घाटनाची घोषणा

Godavari Electric Motors first showroom in Pune; Will sell e-rickshaws, bicycles... | गोदावरी इलेक्ट्रीक मोटर्सचा पुण्यात पहिला शोरुम; ई-रिक्षा, सायकल विकणार...

गोदावरी इलेक्ट्रीक मोटर्सचा पुण्यात पहिला शोरुम; ई-रिक्षा, सायकल विकणार...

मुंबई : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या उत्पादनांच्या इब्‍लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने आज महाराष्ट्रातील पुणे येथे त्‍यांचे पहिले शोरूम मेसर्स सौरभ व्हील्स प्रायव्हेट लिमिटेडचे उद्घाटन केले. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले हे शोरूम ग्राहकांना ईव्ही खरेदीची सुविधा देते तसेच ईव्ही अवलंबतेबाबत जागरूकता वाढवते.

पोलिस उपायुक्त (वाहतूक) आय.पी.एस. विजय कुमार मगर आणि डॉ. अजित शिंदे – आरटीओ पुणे यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन करण्‍यात आले. हा शोरूम १७०० चौरस फूट जागेवर पसरलेले आहे आणि २२ व २३, गगन सिग्नेट, गंगाधाम-कोंडवा रोड, नाना नानी पार्कजवळ, कोंडवा बीके येथे आहे. ग्राहकांना गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून देण्यात आलेल्या ३एस सुविधा मिळतील. हे शोरूम ग्राहकांच्या एण्ड-टू-एण्ड ईव्ही गरजांसाठी सिंगल टच पॉइण्ट बनेल.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्हणाले, ‘‘आम्हाला देशातील ऑटोमोबाइल हबचे केंद्र पुण्यामध्ये प्रवेश करण्याचा आनंद होत आहे. महाराष्ट्रातील अनेक शोरूम्सपैकी पुण्यातील आमचे पहिलेच शोरूम आहे.’’
नुकतीच लाँच करण्यात आलेली ई-ऑटो (एल५एम) आणि ई-सायकल श्रेणी इब्लू स्पिन या ठिकाणी असणार आहे. ती तीन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. दोन्ही वाहनांसाठी डिलिव्हरींना या महिन्याच्या शेवटी सुरूवात होईल.

Web Title: Godavari Electric Motors first showroom in Pune; Will sell e-rickshaws, bicycles...