शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

फादर्स डे निमित्त तुमच्‍या वडिलांना गिफ्ट करा इलेक्ट्रीक स्कूटर्स; कोणते आहेत पर्याय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:04 AM

तुमच्या वडिलांकडे १०-१५ वर्षे झालेली, जुनी स्कूटर किंवा बाईक असणार आहे. कारण त्यांनी त्यांच्या इच्छा, आकांक्षा तुमच्या शिक्षणासाठी, लाडांसाठी गुंडाळून ठेवल्या होत्या.

यंदाचा फादर्स डे उद्या, १८ जूनला साजरा केला जाणार आहे. तुमच्या वडिलांकडे १०-१५ वर्षे झालेली, जुनी स्कूटर किंवा बाईक असणार आहे. कारण त्यांनी त्यांच्या इच्छा, आकांक्षा तुमच्या शिक्षणासाठी, लाडांसाठी गुंडाळून ठेवल्या होत्या. या कर्तव्यांची परतफेड आयुष्यात कधीही होऊ शकत नाही. परंतू, आज तुम्ही त्यांना इलेक्ट्रीक स्कूटर्स भेट देऊ शकता. 

हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एलपी  किंमत – ८६,३९१ रूपये हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ही एक व्‍हेरिएण्‍ट व तीन रंगांमध्‍ये येते. या स्‍कूटरमध्‍ये १२०० वॅट मोटर लावलेली आहे. फोटॉन दोन ड्राइव्‍ह मोड्स: पॉवर व इकोनॉमी असलेली हाय-स्‍पीड स्‍कूटर आहे, जी ४५ किमी/तासची अव्‍वल गती प्राप्‍त करते. ही स्‍कूटर संपूर्ण चार्ज असल्‍यास पॉवर मोडमध्‍ये जवळपास ५० किमीपर्यंत आणि इकोनॉमी मोडमध्‍ये ८० किमीपर्यंत अंतर पार करते.  या स्‍कूटरमध्‍ये पॉलिकार्बोनेट हेडलॅम्‍प, फ्रण्‍ट टेलिस्‍कोप सस्‍पेंशन, फ्रण्‍ट डिस्‍क ब्रेकआणि अॅण्‍टी-थेफ्ट अलार्म आहे. 

ओडीसी हॉक किंमत – ९९,४०० रूपये इलेक्ट्रिक स्‍कूटर हॉक क्रूझ कंट्रोल असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्‍कूटर आहे. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली मोटर व कीलेस इलेक्ट्रिक स्‍टार्ट सिस्‍टम आणि पोर्टेबल बॅटरी आहे. ही स्‍कूटर २ व्‍हेरिएण्‍ट्स हॉक लाइट व हॉक प्‍लससह येते आणि ट्रान्‍स मॅट ब्‍ल्‍यू, इंटेन्‍स रेड, ग्रॅव्हिटी ग्रे, मिरेग व्‍हाइट व चारकोल ब्‍लॅक अशा रंगांत येते. बॅटरी ४ तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते आणि प्रतिचार्ज १७० किमीची रेंज देते. या स्‍कूटरमध्‍ये ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी, अॅडजस्‍टेबल ब्रेक लेव्‍हर, मोबाइल चार्जर पॉइण्‍ट, म्‍युझिक सिस्‍टम, डिजिटल स्‍पीडोमीटर असण्‍यासोबत मोठी बूट स्‍पेस आहे. स्‍कूटर तीन वर्षांच्‍या वॉरंटीसह येते.

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्‍स २.० किंमत – १,०७,००० रूपयेहिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्‍स २.० पसंतीची ईव्ही आहे. १.०७ लाख रूपये किंमत असलेली ही स्‍कूटर एका रंग पर्यायामध्‍ये उपलब्‍ध आहे. स्‍कूटरमध्‍ये २ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी आहे, जी एका चार्जमध्‍ये ८९ किमी/चार्ज रेंज देते. विश्‍वसनीय ब्रेकिंग व सस्‍पेंशन सिस्‍टमसह ऑप्टिमा सीएक्‍स २.० सुलभ ड्रायव्हिंग अनुभव देते.  

ओकिनावा रिज १०० किंमत – ११५,३११ रूपये ओकिनावा रिज १०० एक व्‍हेरिएण्‍ट व तीन रंगांमध्‍ये येते. या स्‍कूटरमध्‍ये शक्तिशाली ८०० वॅट मोटर आणि इलेक्‍ट्रॉनिकली असिस्‍टेड ब्रेकिंग सिस्‍टमसह फ्रण्‍ट व रिअर ड्रम ब्रेक्‍स आहेत. १४९ किमीच्‍या रेंज मिळते. सेंट्रल लॉकिंग, अॅण्‍टी-थेफ्ट सिस्‍टम, जिओ-फेन्सिंग, इमोबिलायझेशन, पार्किंग असिस्‍टण्‍स, ट्रॅकिंगव मॉनिटरिंग. ही स्‍कूटर जवळपास पाच ते सहा तासांत संपूर्ण चार्ज होते आणि ५० किमी/तासची अव्‍वल गती देते. 

ओला एस१ किंमत – १,२९,९९९ रूपये ओला एस१ इलेक्ट्रिक स्‍कूटर ओला एस१ आणि ओला एस१ प्रो या दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. दोन्‍ही मॉडेल्‍समध्‍ये कॉम्‍पॅक्‍ट डिझाइनसह ट्विन-पॉड हेडलाइट्स, एलईडी डीआरएल रिंग, स्‍लीक इंडिकेटर्स, एैसपैस स्‍टोरेज आणि विविध रंग पर्याय आहेत. ८.५ केडब्‍ल्‍यू मोटरची शक्‍ती असलेली ओला एस१ ९० किमी/तासची अव्‍वल गती प्राप्‍त करते आणि प्रतिचार्ज १२१ किमीची रेंज देते, तर ओला एस१ प्रो ११५ किमी/तासची अव्‍वल गती प्राप्‍त करते आणि प्रतिचार्ज १८१ किमीची रेंज देते. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरFather's Dayजागतिक पितृदिन