हास्यास्पद...Harley Davidson च्या चालकाने गाणे वाजविले म्हणून पोलिसांनी पावती फाडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 09:35 AM2019-09-17T09:35:06+5:302019-09-17T09:43:29+5:30

लुंगी बनियान घालून वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. चप्पल किंवा सँडल घालूनही वाहन चालवू शकत नाही. असाच एक नियम आहे बाईकवर किंवा कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावू शकत नाही.

Funny... Police issue chalan to the driver of Harley Davidson for played the song | हास्यास्पद...Harley Davidson च्या चालकाने गाणे वाजविले म्हणून पोलिसांनी पावती फाडली

हास्यास्पद...Harley Davidson च्या चालकाने गाणे वाजविले म्हणून पोलिसांनी पावती फाडली

Next

नवी दिल्ली : देशभरात महाराष्ट्रासह काही राज्ये वगळता कमी अधिक प्रमाणात केंद्र सरकारने केलेला नवा मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. या कायद्यातील दंडाच्या तरतुदीमुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यामुळे अनेकजण वाहतुकीचे नियम पाळू लागल्याचा सकारात्मक बदल दिसू लागला आहे. तरीही असे काही नियम आहेत की ते वाहन चालकांना माहिती नाहीत. याची जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर बऱ्याचदा पोलिसांचे अज्ञानही वाहनचालकांना त्रासदायक ठरते आहे. डिजीलॉकरवरील कागदपत्रे दाखविताना हा अनुभव बऱ्याचदा येतो.


लुंगी बनियान घालून वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. चप्पल किंवा सँडल घालूनही वाहन चालवू शकत नाही. असाच एक नियम आहे बाईकवर किंवा कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावू शकत नाही. दिल्लीमध्ये एका Harley Davidson चालकाचा दंडाचा फटका बसला आहे. या चालकाने फेसबूकवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. 


राघव स्वाती प्रुथी हा दिल्लीतील टिळक नगरात Harley Davidson Road Glide ही बाईक चालवत होता. या मोटारसायकलचे रजिस्ट्रेशनही 22 ऑगस्टला झाले होते. तो बाईकवर हेल्मेट लावून गाणी वाजवत जात होता. जसा सिग्नल हिरवा झाला तसे त्याला एका पोलिसाने रोखले आणि लायसन विचारले. त्याने का थांबविल्याचे विचारल्यावर एसीपी टिळक नगरात कारमध्ये आहेत त्यांना बाईकचे कागदपत्र दाखवायचे आहेत किंवा पोलिस ठाण्यात जावे लागेल असे उत्तर या पोलिस कर्मचाऱ्याने दिले. 


पोलिसाने सांगितले की बाईकवरील सँडलबॅग आणि स्पिकर विक्रीपश्चात लावलेले आहेत आणि बाईकला राघवने मॉडिफाय केले आहे. हे ऐकून मोटारसायकलस्वार चक्रावून गेला. त्याला पोलिसांच्या या ज्ञानावर हसावे की रडावे तेच समजत नव्हते. शेवटी त्याने मोबाईलवर त्या बाईकचे कंपनीचे अधिकृत व्हिडीओ दाखविले. तरीही हे पोलिस ऐकायचे नाव घेत नव्हते. त्यांनी बाईक बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथेही पोलिसांनी हैरान केले. पोलिस ठाण्यात पोलिसांनी बाईवरील गाणे वाजविले आणि मोटारसायकलवर गाणे वाजविले म्हणून दंडाची पावती फाडली. 


राघवने याची तक्रार सोशल मिडीया आणि ईमेलवर दिल्ली पोलिसांकडे केली. त्याला सोशल मिडीयावर तिळक नगर पोलिसांचाच नंबर देण्यात आला. त्याने वाहतूक निरिक्षकाकडे त्याची बाजू मांडली मात्र त्या निरिक्षकाने काहीच उत्तर दिले नाही. पोलिसांनी राघवचे ड्रायव्हिंग लायसनही जप्त केले आहे.


आरटीओचे आणि पोलिसांचे नियम वेगळे कसे?
वाहन मॉडिफाय केले असल्यास आरटीओच्या ढीगभर परवानग्या घ्याव्या लागतात. मात्र, जेव्हा कंपन्याच गाड्या बनवितात तेव्हा त्या गाड्यांचे प्रारूप, लांबी, रुंदी, फिचर्स आदी गोष्टी या आरटीओची संमती मिळवूनच बनविल्या जातात. अगदी गाडीचे हेडलाईटचे बल्बही किती क्षमतेचे असावेत हेही आरटीओने ठरवलेले असते. हार्ले डेव्हिडसन जरी परदेशी कंपनी असली तरीही तिला भारतात वाहन विक्रीचे लायसन केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेले आहे. त्याशिवाय ही कंपनी भारतात गाड्या विक्री करू शकत नाही. मग आरटीओने स्पीकर लावलेली बाईक पासिंग केली याचा अर्थ ती नियमामध्ये आहे. त्या बाईकला पोलिसांनी कसे नियमबाह्य ठरवत दंड केला, हा मुद्दा उपस्थित झाला आहे.  

Web Title: Funny... Police issue chalan to the driver of Harley Davidson for played the song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.