टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:35 IST2026-04-07T16:34:36+5:302026-04-07T16:35:32+5:30
या यादीत मारुती सुझुकी, टाटा आणि रेनो या कंपन्यांच्या कारचा समावेश होतो...

टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
एखादी नवी कार खरेदी करताना ग्राहक लूक आणि फीचर्ससोबतच बजेटलाही महत्त्व देत असतात. महागडी कार घेणे सर्वांनाच शक्य नसते, अशा वेळी कमी किमतीत दमदार फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय वाहन बाजारात ५ लाख रुपयांच्या आत काही जबरदस्त पर्याय आहेत. या यादीत मारुती सुझुकी, टाटा आणि रेनो या कंपन्यांच्या कारचा समावेश होतो.
मारुति सुजुकी सेलेरियो -
मारुती सुझुकी सेलेरियोची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ४.६९ लाख रुपये एवढी आहे. ही कार चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते. या कारला १.० लीटर पेट्रोल इंजिन असून सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. दुसरी कार म्हणजे, मारुती एस-प्रेसो, हिची एक्सशोरूम किंमत ३.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. ही सध्याची सर्वात स्वस्त कार आहे. या कारला ५-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
ऑल्टो K10 -
याशिवाय, लोकप्रिय ऑल्टो K10 ही देखील एक कार आहे. हिची एक्स शोरूम किंमत ३.६९ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. या कारला K10C १.०-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ६३ bhp आणि ८९ Nm टॉर्क जनरेट करते. हे ५-स्पीड ट्रान्समिशनसोबत जोडण्यात आले आहे.
टाटा टियागो -
कमी बजेटमध्ये प्रीमियम हॅचबॅकचा अनुभव हवा असल्यास टाटा टियागो हा एक उत्तम पर्याय आहे. या कारची एक्सशोरूम किंमत ४.५९ लाख रुपए एवढी आहे. सुरुवातीच्या किमतीत मिळणाऱ्या या कारमध्ये १.२ लीटर इंजिन असून ती मॅन्युअल आणि एएमटी अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे.
एसयूव्हीसारखा लूक आवडणाऱ्यांसाठी रेनो क्विड -
याशिवाय, एसयूव्हीसारखा लूक आवडणाऱ्यांसाठी रेनो क्विड हा देखील एक उत्तम पर्याय आहे. हीची एक्सशोरूम किंमत ४.२९ लाख रुपये एवढी आहे. यात १.० लीटर इंजिन देण्यात आले असून ते ६७ bhp पॉवर जनरेट करते. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी हे पाचही पर्याय उत्म मानले जातात.