फोर्ड इंडियाकडून BS6 इंजिनसह EcoSport लाँच, जाणून घ्या फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 04:07 PM2020-01-21T16:07:15+5:302020-01-21T16:07:39+5:30

फोर्ड इंडियानं नवी इकोस्पोर्ट्स (EcoSport) लाँच केली आहे.

Ford India launches EcoSport with BS6 engine, Learn Features | फोर्ड इंडियाकडून BS6 इंजिनसह EcoSport लाँच, जाणून घ्या फीचर्स

फोर्ड इंडियाकडून BS6 इंजिनसह EcoSport लाँच, जाणून घ्या फीचर्स

Next

नवी दिल्लीः फोर्ड इंडियानं नवी इकोस्पोर्ट्स (EcoSport) लाँच केली आहे. 2020मध्ये इकोस्पोर्ट्स BS6 इंजिनसह बाजारात आणली आहे. फोर्ड इंडियानं इकोस्पोर्ट्समधलं 1 लीटरचं इकोबूस्ट इंजिन बंद केलेले आहे. इकोस्पोर्ट्स पेट्रोल आणि डिझेल पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. BS6 इंजिनच्या पेट्रोल आवृत्तीतल्या मॉडलची किंमत 8.04 लाख रुपये आहे. तसेच BS4 इंजिनच्या मॉडलची किंमत 7.91 लाख रुपयांच्या घरात आहे. नव्या इकोस्पोर्ट्सच्या पेट्रोल आवृत्तीच्या सुरुवातीच्या मॉडलची किंमत 13 हजार रुपयांनी वाढली आहे. तर 2020 इकोस्पोर्ट्सच्या टॉप-इंड मॉडल(Titanium+ ऑटोमॅटिक)च्या एक्स शोरूमची किंमत 11.43 लाख रुपये आहे. जुन्या मॉडलच्या तुलनेत BS6 पेट्रोल इंजिनचं टॉप इंड मॉडल 13 हजारांनी महागलं आहे.  

BS6 डिझेल इंजिनच्या मॉडलची किंमत 8.54 लाखांच्या जवळपास
BS6 डिझेल इंजिनसह येणार इकोस्पोर्ट्सची सुरुवातीच्या मॉडलची किंमत 8.54 लाखांच्या घरात आहे. तसेच BS6 डिझेल इंजिनच्या टॉप मॉडल(Titanium+ मॅन्युअल स्पोर्ट्स)ची किंमत 11.58 लाख रुपये आहे. BS6 डिझेल इंजिनची नवी कार जुन्या मॉडलच्या तुलनेत 13 हजार रुपयांनी महागली आहे.  BS6 इंजिनची नवी इकोस्पोर्ट्स स्टँडर्ड 3 वर्षं किंवा 100,000 किलोमीटरची फॅक्ट्री वॉरंटी देत आहे. इंजिनशिवाय या कारमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

कंपनीच्या दाव्यानुसार, पेट्रोल इंजिन 15.9 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देत आहे. डिझेल इंजिन 21.7 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देतं. BS6 डिझेल इंजिनसह येणाऱ्या नव्या इकोस्पोर्ट्समध्ये 1.5 लीटर TDCi डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. जे 100 पीएस पॉवर आणि 215Nmचा टॉर्क निर्माण करतं. तसेच BS6 पेट्रोल इंजिनच्या नव्या इकोस्पोर्ट्समध्ये 3 सिलिंडरसह 1.5 लीटर Ti-VCT पेट्रोल इंजिन बसवण्यात आलं आहे, जे 122 PSची पॉवर आणि 149 Nmचं टॉर्क निर्माण करतं.

इकोस्पोर्ट्समध्ये पेट्रोल इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. नव्या EcoSportमध्ये पहिल्यासारखंच एक्सटीरियर आणि इंटीरियरची झलक पाहायला मिळणार आहे. EcoSportच्या अनेक मॉडलमध्ये सनरूफचा पर्याय देण्यात आला आहे. चांगल्या सुरक्षेसाठी EcoSportमध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. यात SYNC 3 इंफोटेन्मेंट सिस्टम, 8 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. ऑटोमॅटिक HID हेडलॅप्स, डेटाइम रनिंग लाइट्स, इलेक्ट्रोक्रोमिक मिरर, रेन सेंसिंग वायपर्स आणि पुश-बटन स्टार्ट देण्यात आलं आहे. 

Web Title: Ford India launches EcoSport with BS6 engine, Learn Features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fordफोर्ड