भारत एनकॅपची पहिली क्रॅश टेस्ट रेटिंग आली! या दोन कारना फाईव्ह स्टार मिळाले; गडकरींनी प्रमाणपत्र दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 11:22 AM2023-12-21T11:22:34+5:302023-12-21T11:23:13+5:30

Bharat Ncap Safety Rating: यापुढे ग्लोबल एनकॅपमध्ये भारतीय कारची सेफ्टी टेस्ट केली जाणार नाहीय. यामुळे BNCAP वरच कंपन्यांना आणि ग्राहकांना अवलंबून रहावे लागणार आहे.  

First Crash Safety rating of Bharat Ncap is here! Tata Safari, Harrier received five stars; Gadkari gave the certificate | भारत एनकॅपची पहिली क्रॅश टेस्ट रेटिंग आली! या दोन कारना फाईव्ह स्टार मिळाले; गडकरींनी प्रमाणपत्र दिले

भारत एनकॅपची पहिली क्रॅश टेस्ट रेटिंग आली! या दोन कारना फाईव्ह स्टार मिळाले; गडकरींनी प्रमाणपत्र दिले

Bharat Ncap Safety Rating ( Marathi News ) काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या भारत एनकॅपची पहिली रेटिंग आली आहे. यामध्ये टाटाच्या दोन दणकट एसयुव्हींचा नंबर लागला आहे. ग्राहकांना सर्व्हिस देण्यामध्ये मागे असलेल्या टाटा मोटर्सने सेफ्टी रेटिंगमध्ये बाजी मारली आहे. यापुढे ग्लोबल एनकॅपमध्ये भारतीय कारची सेफ्टी टेस्ट केली जाणार नाहीय. यामुळे BNCAP वरच कंपन्यांना आणि ग्राहकांना अवलंबून रहावे लागणार आहे.  

टाटाच्या सफारी आणि हॅरिअरला भारत एनकॅपमध्ये (Bharat NCAP) फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. अशाप्रकारे बीएनकॅपमध्ये या दोन पहिल्या फाईव्ह स्टार मिळालेल्या कार ठरल्या आहेत. भारतात सेफ्टी कारची यादी मोठी मोठी होत चालली होती. परंतू, मारुती सुझुकी, टोयोटा यासारख्या कंपन्या काही दूरदूरपर्यंत दिसत नव्हत्या. या कंपन्यांच्या बहुतांश कारना ग्लोबल एनकॅपमध्ये झिरो स्टार रेटिंग किंवा कमी रेटिंग मिळाली होती. यामुळे Bharat NCAP मध्ये या कंपन्यांच्या कार कसा परफॉर्मन्स दाखवितात याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. 

टाटा सफारी आणि हॅरियरला प्रौढ सुरक्षेमध्ये 32 पैकी 30.08 गुण मिळाले आहेत आणि मुलांच्या सुरक्षेत 49 पैकी 44.54 गुण मिळाले आहेत. या दोन्ही SUV मध्ये अधिकाधिक 7 एअरबॅग आहेत. ज्यामध्ये त्याच्या सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग उपलब्ध आहेत. 

या दोन एसयुव्हींना फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्वत: नितीन गडकरींनी याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करून माहिती दिली आहे. 

टाटाला सर्व्हिसमध्ये सुधारणा करण्याची गरज
टाटाने फक्त ट्रकच बनवावेत असे एकेकाळी बोलले जात होते. परंतू, टाटाने गेल्या काही वर्षांत एक परदेशी कंपनी विकत घेतली आणि त्याचा फायदा देशातील पॅसेंजर कार उद्योगासाठी करून घेतला आहे. यामुळे टाटाने बिल्ड क्लालिटी चांगली दिली आहे. असे असले तरी टाटाला सर्व्हिस काही सुधारता आलेली नाही. इतर कंपन्यांच्या तुलनेत टाटाच्या अनेक ग्राहकांना टाटाच्या वाईट सर्व्हिसचा अनुभव आलेला आहे. सोशल मीडियावर अनेक ग्राहक याच्या तक्रारी करत असतात. सेलमध्ये टाटा आता दोन नंबरवर आलेली आहे. 
 

Web Title: First Crash Safety rating of Bharat Ncap is here! Tata Safari, Harrier received five stars; Gadkari gave the certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.