Ferrari ने लॉन्च केली ५०वी कन्व्हर्टेबल कार, जाणून घ्या 488 Pista Spyder ची खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 04:16 PM2018-08-27T16:16:31+5:302018-08-27T16:17:30+5:30

जगप्रसिद्ध स्पोर्ट कार निर्माती कंपनी फरारीने आपली ५०वी कन्व्हर्टेबल कार लॉन्च केली आहे.

Ferrari launches 50 V convertible car, learn 488 Pista Spyder's specialty! | Ferrari ने लॉन्च केली ५०वी कन्व्हर्टेबल कार, जाणून घ्या 488 Pista Spyder ची खासियत!

Ferrari ने लॉन्च केली ५०वी कन्व्हर्टेबल कार, जाणून घ्या 488 Pista Spyder ची खासियत!

Next

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध स्पोर्ट कार निर्माती कंपनी फरारीने आपली ५०वी कन्व्हर्टेबल कार लॉन्च केली आहे. Ferrari 488 Pista Spyder असं या कारला नाव देण्यात आलं आहे. या आलिशान कारमध्ये मेटलचं फोल्डिंग रुफ तयार करण्यात आलं आहे. त्यासोबतच या लक्झरी स्पोर्ट कारमध्ये अनेक नवीन फीचर्सही देण्यात आले आहेत.

नवीन फरारी Ferrari 488 Pista Spyder या कारमध्ये ३.९ लिटरचं V8 इंजिन लावण्यात आलं आहे. हे इंजिन ७२० बीएचपीची पॉवर आणि ७७० एनएमचा टॉर्क जनरेट करतं. ही कार ० ते १०० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने केवळ २.८५ सेकंदात पूर्ण करते. या कारची टॉप स्पीड ३४० किलोमीटर प्रति तास आहे.  

Ferrari 488 Pista Spyder मध्ये फायबर रेस व्हील लावण्यात आलं आहे. भारतातही लक्झरी स्पोर्ट कारला चांगलीच पसंती आहे. लवकरच ही कार भारतीय रस्त्यांवर धावताना बघायला मिळणार आहे. अजून या कारची किंमत जाहीर करण्यात आलेली नाहीये.

Web Title: Ferrari launches 50 V convertible car, learn 488 Pista Spyder's specialty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.