फरारी ते जीप, जुलै महिन्यात लॉन्च होणार आहेत या आलिशान कार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 15:56 IST2018-07-03T15:56:12+5:302018-07-03T15:56:40+5:30
जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जुलै महिन्याक लॉन्च होत असलेल्या काही कार्सती माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

फरारी ते जीप, जुलै महिन्यात लॉन्च होणार आहेत या आलिशान कार!
भारतात या महिन्यात(जुलै) काही खास कार्स लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ज्या कार खरेदी करायची आहे त्यांच्याकडे वेगवेगळे पर्याय असणार आहेत. अशात जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जुलै महिन्याक लॉन्च होत असलेल्या काही कार्सती माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
फरारी पोर्टोफिनो
(Image Credit: webcartop.jp)
या कारचं नाव इटलीच्या एका सुंदर शहरावरून पडलं आहे. या स्पोर्ट कारमध्ये 3.9 लिटर टर्बोचार्ज V8 इंजिन देण्यात आलं आहे. जे 7500rpm वर 600bhp ची पावर निर्माण करतं आणि 3000rpm वर 760Nm चा टार्क जनरेट करतं. या कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असून या कारला 0ते 100 किमी प्रवास करण्यासाठी प्रति तास 3.5 सेकंदाचा वेळ लागतो. या कारच्या लॉन्चची ऑफिशिअल घोषणा होणे बाकी आहे.
वोल्वो XC40
(Image Credit: www.volvocars.com)
XC40 ही कार 4 जुलैला लॉन्च केली जाणार आहे. ही भारतातील सर्वात लहान SUV कारपैकी एक असेल. पहिल्या लॉटमध्ये केवळ 200 यूनिट्स लॉन्च केले जाणार आहेत. या कारमध्ये 1969 सीसी इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 192.6 ची पावर आणि 400Nm पीक टार्क जनरेट करतं. या कारमध्ये 8 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलंय. या आलिशान कारचा टॉप स्पीड 210 किमी प्रति तास आहे. या कारची किंमत जाहीर झाली नसली तरी अंदाजे 40 ते 45 लाख रुपये असू शकते.
पोर्शे 911 जीटी 2 आरएस
ही कार सुद्धा याच महिन्यात लॉन्च होणार असून या कारची किंमत 4 कोटींच्या आसपास असू शकते. या कारमध्ये 3.8 लिटरचं फ्लॅट 6 ट्विन टर्बोजेट इंजिन देण्यात आलंय. तसेच या कारमध्ये 7 स्पीड ड्यूअल ट्रान्समिशन सिस्टिम देण्यात आलीये.
जीप कम्पस ट्रेलहॉक
(Image Credit: www.autocarindia.com)
कम्पसच्या नवं व्हर्जन ट्रेलहॉक या कारला यावर्षी मार्च महिन्यात एका प्रायव्हेट इव्हेंटमध्ये सादर करण्यात आलं होतं. या कारमध्ये 2.0 लिटरचं डीझेल इंजिन देण्यात आलंय. या कारमध्ये 9 स्पीड AT आणि रेंज गिअरबॉक्स दिला गेलाय. या कारच्या किंमतीबाबतही खुलासा करण्यात आला नाहीये.