कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:21 IST2025-11-06T11:19:44+5:302025-11-06T11:21:26+5:30
Hero Electric Car Launch: भारतातील दुचाकी क्षेत्रातील या दिग्गजाने इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या भविष्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.

कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
दुचाकी उत्पादनात आघाडीवर असलेल्या हिरो मोटोकॉर्प या भारतीय कंपनीने आता ईलेक्ट्रीक चारचाकी क्षेत्रातही उतरण्याची तयारी सुरु केली आहे. कंपनीच्या VIDA युनिटने इटलीतील मिलान येथे आयोजित 'EICMA 2025' या जागतिक दुचाकी प्रदर्शनात आपल्या नव्या 'नोव्हस' (Novus) रेंज अंतर्गत एका मायक्रो इलेक्ट्रिक फोर-व्हीलरचे अनावरण केले आहे.
विडाच्या ताफ्यात ही दोन सीटर मायक्रो इलेक्ट्रीक 'NEX 3' नावाची कार लवकरच दिसण्याची शक्यता आहे. ही छोटी कार असल्याने या कारची किंमतही ३.५-४ लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. याद्वारे हिरो मोटोकॉर्पने केवळ दुचाकींपुरते मर्यादित न राहता, चारचाकींच्या बाजारपेठेतही प्रवेश करण्याची तयारी दर्शविली आहे.
NEX 3 ची वैशिष्ट्ये
हे एक 'ऑल-वेदर पर्सनल EV' आहे. यात टँडम सीटिंग (पुढच्या-मागच्या बाजूला दोन सीट) असून हे शहरी आणि ग्रामीण दोन्ही प्रवासांसाठी सुरक्षितता आणि आराम देणारे आहे, अशी माहिती हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल यांनी दिली. नोव्हस रेंज अंतर्गत कंपनीने NEX 1 (पोर्टेबल, वेअरेबल मायक्रो मोबिलिटी डिव्हाइस) आणि NEX 2 (इलेक्ट्रिक ट्रायके) यांसारख्या मोबिलिटी सोल्युशन्सचेही प्रदर्शन केले.
याबरोबरच हिरो मोटोकॉर्पने VIDA चे पहिले जागतिक इलेक्ट्रिक मोटरसायकल कॉन्सेप्ट 'VIDA Concept Ubex' आणि अमेरिकेतील Zero Motorcycles सोबत विकसित केलेले 'VIDA Project VxZ' याचेही प्रदर्शन केले. या अनावरणामुळे, हिरो मोटोकॉर्प आता केवळ 'दुचाकी' कंपनी राहिली नसून, ती आता भविष्यातील 'इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स' देणारी कंपनी म्हणून उदयास येत आहे.