मोठा उलटफेर! ओला इलेक्ट्रिकला धोबीपछाड देत 'एम्पीयर'ची टॉप ५ मध्ये एन्ट्री; टीव्हीएस आजही पहिल्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 08:23 IST2026-03-02T08:22:21+5:302026-03-02T08:23:28+5:30
Electric Scooter Sales February 2026: फेब्रुवारी २०२६ च्या ईव्ही विक्री अहवालानुसार ओला इलेक्ट्रिक टॉप ५ मधून बाहेर पडली आहे. टीव्हीएस, बजाज आणि एथरने वर्चस्व कायम राखले असून एम्पीयरने ५ व्या स्थानी झेप घेतली आहे. पाहा सविस्तर आकडेवारी.

मोठा उलटफेर! ओला इलेक्ट्रिकला धोबीपछाड देत 'एम्पीयर'ची टॉप ५ मध्ये एन्ट्री; टीव्हीएस आजही पहिल्या क्रमांकावर
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात फेब्रुवारी २०२६ मध्ये ऐतिहासिक बदल पाहायला मिळाले आहेत. प्रदीर्घ काळापासून टॉप ५ मध्ये असलेल्या ओला इलेक्ट्रिकची घसरण झाली असून, ग्रीव्हज कॉटनच्या एम्पीयर ब्रँडने दमदार कामगिरी करत ५ व्या स्थानी झेप घेतली आहे. सेवा आणि गुणवत्तेच्या तक्रारींमुळे ओलाच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ओला इलेक्ट्रिकने फेब्रुवारीमध्ये केवळ 3,891 युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक कमी आहे. सेवा नेटवर्कमधील समस्या आणि ब्रँड ट्रस्ट कमी झाल्याचा फटका ओलाला बसला आहे. एम्पीयरने त्यांच्या 'नेक्सस' आणि 'मॅग्नस' मॉडेल्सच्या जोरावर ओलाला मागे टाकले.
टीव्हीएसची मक्तेदारी
टीव्हीएस मोटरने आपल्या 'आयक्व्युब' सिरीजच्या जोरावर २८ टक्क्यांहून अधिक मार्केट शेअरसह पहिले स्थान कायम राखले आहे. बजाज चेतकने २३ टक्के मार्केट शेअरसह दुसरे स्थान पटकावले आहे, तर एथर एनर्जी १८ टक्के शेअरसह तिसऱ्या स्थानी आहे.
| रँक | कंपनी (ब्रँड) | विक्री (फेब्रुवारी २०२६) |
| १ | TVS Motor (iQube) | 30,512 युनिट्स |
| २ | Bajaj Auto (Chetak) | 24,239 युनिट्स |
| ३ | Ather Energy | 19,738 युनिट्स |
| ४ | Hero MotoCorp (Vida) | 11,960 युनिट्स |
| ५ | Greaves Electric (Ampere) | 4,478 युनिट्स |