Hero Splendor Electric: ईलेक्ट्रीक दुचाकींचा बाजार उठणार! हिरो स्प्लेंडर ईव्ही येतेय; मुंबई-पुणे-लोणावळा एकाच खेपेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:07 IST2022-03-24T15:06:08+5:302022-03-24T15:07:05+5:30
Hero Splendor Electric News: गेल्याच महिन्यात हिरो इलेक्ट्रीकने व्हिडा (Vida) नावाचा इलेक्ट्रीक दुचाकींचा ब्रँड लाँच केला होता. याद्नारे ही लोकप्रिय बाईक ईलेक्ट्रीक अवतारात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

Hero Splendor Electric: ईलेक्ट्रीक दुचाकींचा बाजार उठणार! हिरो स्प्लेंडर ईव्ही येतेय; मुंबई-पुणे-लोणावळा एकाच खेपेत
देशातील सर्वात लोकप्रिय बाईक कोणती? गेल्या अनेक वर्षांपासून एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर आहे, ती म्हणजे हिरोची स्प्लेंडर. ही बाईक मायलेजमध्ये टॉपवर असल्याने देशात पाण्यासारखी खपली आहे. आता हीच बाईक हिरो कंपनी व्हिडा ब्रँडद्वारे इलेक्ट्रीकमध्ये आणत असल्याची बाजारात गरमागरम चर्चा सुरु झाली आहे.
गेल्याच महिन्यात हिरो इलेक्ट्रीकने व्हिडा (Vida) नावाचा इलेक्ट्रीक दुचाकींचा ब्रँड लाँच केला होता. याद्नारे ही लोकप्रिय बाईक ईलेक्ट्रीक अवतारात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सिंगल चार्जमध्ये ही बाईक एकाच खेपेला पुणे-मुंबई आणि रिटर्न येताना लोणावळ्यापर्यंत येणार आहे. (Hero Splendor Electric)
सध्या या बाईकला रेट्रोफिट करता येत आहे. आरटीओकडून एका कंपनीने परवानगी मिळविली आहे. या बदलांसाठी ३५००० रुपयांचा खर्च असून बॅटरी आणि जीएसटी आदि वेगळा खर्च असणार आहे. यामुळे जर मूळ हिरो कंपनीनेच जर ही बाईक इलेक्ट्रीकमध्ये आणली तर सध्याच्या बाईकच्या किंमतीवर २०-३० हजार रुपये मोजल्यास इलेक्ट्रीक पर्याय मिळणार आहे.
एका ऑटो पोर्टलने Hero Splendor च्या इलेक्ट्रिक व्हर्जनबद्दल असा अंदाज लावला आहे की यात 4kWh चा बॅटरी पॅक असू शकते. तसेच यात 2kWh ची अतिरिक्त बॅटरी देखील दिली जाऊ शकते. यासह, एका चार्जमध्ये बाइकला 240 किमीपर्यंतची रेंज मिळेल.