इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:58 IST2025-10-09T06:58:47+5:302025-10-09T06:58:56+5:30

इव्ही बाजारात टाटा मोटर्सचा दबदबा कायम; टेस्लाही उतरली मैदानात; पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे ओढा

Electric car sales double; New record in September; 15 thousand EVs sold | इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री

इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील इलेक्ट्रिक कार विक्रीत सप्टेंबर महिन्यात अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा)च्या ताज्या आकडेवारीनुसार, इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची एकूण किरकोळ विक्री दुपटीहून अधिक वाढून १५ हजार ३२९ युनिट्सवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच महिन्यात ही विक्री फक्त ६ हजार १९१ युनिट्स इतकी होती.

इव्ही बाजारात टाटा मोटर्सने आपले वर्चस्व कायम राखले आहे. कंपनीने सप्टेंबर २०२५मध्ये ६ हजार २१६ इलेक्ट्रिक कार्स विकल्या. मागील वर्षीच्या ३ हजार ८३३ कार विक्रीच्या तुलनेत यात तब्बल ६२ टक्क्यांनी वाढ आहे. एमजी मोटरने मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल तीनपट वाढ नोंदवली आहे. महिंद्रा अँड महिंद्रानेही उल्लेखनीय झेप घेत सप्टेंबरमध्ये ३ हजार २४३ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे.

इव्ही बाजारात ‘दुप्पट’ वाढीचे मिळत आहेत संकेत
तज्ज्ञांच्या मते वाढते इंधन दर, शासकीय प्रोत्साहन योजना आणि चार्जिंग नेटवर्कचा विस्तार 
यामुळे इव्ही वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. येत्या काही महिन्यातही ही वाढीची गती कायम राहण्याची शक्यता आहे. 
मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती
सहा महिन्यांत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या किमतीइतक्याच असतील, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ अपेक्षित आहे.

दुचाकी विक्रीतही मोठी वाढ : सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीतही उल्लेखनीय वाढ झाली आहे. या महिन्यात एकूण १ लाख ४ हजार २२० दुचाकी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी ही विक्री ९० हजार ५४९ इतकी होती. आता या विक्रीत १५ टक्के वाढ झाली आहे.

इव्ही दुचाकी विक्रीत टॉप नेमके कोण आहे?

टीव्हीएस मोटर     २२,५०९
बजाज ऑटो     १९,५८०
एथर एनर्जी     १८,१४१
ओला इलेक्ट्रिक     १३,३८३
हिरो मोटोकॉर्प      १२,७५३

Web Title : इलेक्ट्रिक कार की बिक्री दोगुनी; सितंबर में नया रिकॉर्ड; 15,000 ईवी बिकीं

Web Summary : सितंबर में भारत में इलेक्ट्रिक कार की बिक्री दोगुनी होकर 15,329 यूनिट हो गई। टाटा मोटर्स बाजार में सबसे आगे है, उसके बाद एमजी मोटर और महिंद्रा हैं। इलेक्ट्रिक दोपहिया वाहनों की बिक्री में भी 15% की वृद्धि हुई, जिसमें टीवीएस मोटर शीर्ष पर है।

Web Title : Electric car sales double; New record in September; 15,000 EVs sold

Web Summary : India's electric car sales doubled in September, reaching 15,329 units. Tata Motors leads the market, followed by MG Motor and Mahindra. Electric two-wheeler sales also saw a 15% increase, with TVS Motor topping the charts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.