एकच नंबर! सिंगल चार्जमध्ये 1,000 किलोमीटर इलेक्ट्रिक ट्रक चालवून या कंपनीने केला वर्ल्ड रेकॉर्ड 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:22 PM2021-09-15T17:22:28+5:302021-09-15T17:22:44+5:30

DPD, Futuricum आणि Continental ने एक खास इलेक्ट्रिक ट्रक सिंगल चार्जमध्ये 1,099 KM चालवला आहे. दोन ड्रायव्हर्सनी 4.5 तासांच्या शिफ्टमध्ये 392 फेऱ्या पूर्ण केल्या. 

Dpd futuricum continental electric truck run 1099 km in single charge make guinness world record  | एकच नंबर! सिंगल चार्जमध्ये 1,000 किलोमीटर इलेक्ट्रिक ट्रक चालवून या कंपनीने केला वर्ल्ड रेकॉर्ड 

एकच नंबर! सिंगल चार्जमध्ये 1,000 किलोमीटर इलेक्ट्रिक ट्रक चालवून या कंपनीने केला वर्ल्ड रेकॉर्ड 

Next

जर्मन पॅकेज डिलिव्हरी सर्विस प्रोव्हायडर DPD, ई-ट्रक निर्माता Futuricum आणि टायर निर्माता Continental अशा तीन कंपन्यांनी एकत्र येऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book of World Record) बनवला आहे. सर्व कंपन्यांनी एकत्रिरीत्या Futuricum चा खास इलेक्ट्रिक ट्रक सिंगल चार्जमध्ये 1,099 किलोमीटर चालवला आहे. ही कामगिरी करण्यासाठी एकूण 23 तासांचा कालावधी लागला आणि दोन ड्रायव्हर्सनी हा विक्रम पूर्ण करण्यास मदत केली.  

DPD या पॅकेज डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या दोन वाहन चालकांनी 4.5 तासांच्या शिफ्ट घेऊन हा विक्रम केला आहे. त्यांनी Futuricum आणि Continental सह मिलकर Guinness Book of World Record मध्ये नाव नोंदवले आहे. वर सांगितल्याप्रमाणे कंपनीने एका खास ट्रॅकवर इलेक्ट्रिक ट्रक सिंगल चार्जमध्ये 1,099 KM चालवला आहे. हा विक्रम पूर्ण करताना 23 तासांत ताशी 50 किलोमीटर वेगाने 392 फेऱ्या मारण्यात आल्या.  

या ट्रकची निर्मिती करणारे Futuricum ब्रँडच्या मालकी असणाऱ्या Designwerk Products कंपनीचे सीईओ अ‍ॅड्रिन मेलीगर यांनी सांगितले कि, कंपनीने एक  Volvo FH ट्रक इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये रूपांतरित केला आहे. या इस ट्रकमधील मोटर 680bhp पॉवर निर्माण करू शकते तसेच यात 680kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आहे. DPD Switzerland कंपनी देखील आपल्या व्यवसायिक वापरासाठी इलेक्ट्रिक व्हेइकल्समध्ये गुंतवणुक करणार आहे.  

Web Title: Dpd futuricum continental electric truck run 1099 km in single charge make guinness world record 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app