जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 20:44 IST2025-09-02T20:43:51+5:302025-09-02T20:44:11+5:30
जीएसटीमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. यामुळे कारच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटी परिषदेची उद्यापासून दोन दिवसांची बैठक आहे.

जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली...
वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणला जाणार आहे. याचा फायदा ऑटो कंपन्यांना होणार असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिन्याच्या मध्यावर केलेल्या घोषणेमुळे ऑगस्ट महिन्यात विक्रीला ब्रेक लागला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा आणि टाटा मोटर्स या आघाडीच्या चारही कंपन्यांच्या कार विक्रीत मोठी घट झाली आहे.
अनेक ग्राहकांनी त्यांची कार खरेदी पुढे ढकलली आहे. जवळपास पन्नास हजार ते लाखभराने कारच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटीमध्ये मोठा बदल केला जाणार आहे. यामुळे कारच्या किंमती कमी होणार आहेत. जीएसटी परिषदेची उद्यापासून दोन दिवसांची बैठक आहे. यात हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांची विक्री मंदावली आहे.
मारुती सुझुकीने गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या ऑगस्टमध्ये ८ टक्के कमी विक्री नोंदविली आहे. गेल्या वर्षी १,४३,०७५ वाहने विकली होती, यंदा कंपनीला १,३१,२७८ कारच विकता आल्या आहेत. बलेनो, स्विफ्ट, डिझायर आणि इग्निस सारख्या कॉम्पॅक्ट कारची विक्री वाढली आहे. परंतू, अल्टो, एस-प्रेसो आणि ग्रँड विटारा, ब्रेझा, एर्टिगा आणि एक्सएल६ सारख्या कारची विक्री घसरली आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाची विक्री देखील ११ टक्क्यांनी घटली आहे. या ऑगस्टमध्ये ४४,००१ युनिट्स विकली गेली आहेत. यावर कंपनीने जीएसटी निर्णयापूर्वी मुद्दामहून कमी उत्पादन केले गेले, कारण डीलरकडे स्टॉक पडून राहिला असता, असे कारण दिले आहे. टाटा मोटर्सच्या विक्रीतही ७ टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीने ४१,००१ वाहने विकली आहेत. टोयोटाची विक्री २ टक्क्यांनी वाढून २९,३०२ युनिट्स झाली आहे.