डॅटसनची नवीन गो, गो प्लस लाँच; किंमत 3.83 लाखांपासून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 17:27 IST2018-10-10T17:26:34+5:302018-10-10T17:27:21+5:30
डॅटसन गो ची किंमत 3.29 लाख रुपये असून प्लसची किंमत 3.83 लाखांपासून सुरु होत आहे.

डॅटसनची नवीन गो, गो प्लस लाँच; किंमत 3.83 लाखांपासून
निस्सानची उपकंपनी डॅटसनने भारतात गो, गो प्लस या दोन कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले आहे. डॅटसन गो ची किंमत 3.29 लाख रुपये असून प्लसची किंमत 3.83 लाखांपासून सुरु होत आहे.
डॅटसनने नवीन गो रेंजला चार वर्षांनी अपडेट केले आहे. ते गरजेचेही होते. कारमध्ये बरेच कॉस्मेटिक बदलही केले आहेत. तसेच नवीन कारला पहिल्यापेक्षा आरामदायक बनविण्यात आले आहे. सेफ्टी फिचर्सही देण्यात आले आहेत.
दोन्ही कारमध्ये नवीन रंग अम्बर ऑरेंज आणि सन्सटॉन ब्राउन लाँच करण्यात आले आहे. तसेच बाहेरुनही कारमध्ये बदल करण्यात आले आहेत. षटकोणी आकारातील ब्लॅक ग्रील, क्रोम लूक यासह नवीन बंपर देण्यात आला आहे. 14 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील देण्यात आले आहेत.
गो ही हॅटबॅकमध्ये असून यामध्ये 5 सीट आहेत. तर गो प्लस 7 सीटर आहे. मात्र, मागील सीट या केवळ लहान मुले बसू शकतील अशाच आहेत. मल्टी फंक्शनल डिस्प्ले, अँटी फॅटींग फ्रंट सीट, ७ इंचाची टच स्क्रीन आदी नवीन बदल करण्यात आले आहेत.