शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच येतेय Maruti ची इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्चमध्ये 550Km रेंज देईल! जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:29 IST

अशा पद्धतीने आता इलेक्ट्रिक कार बाजारात दिग्गज कार कंपनीची एन्ट्री होत आहे.

लोक बऱ्याच दिवसांपासून मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कारच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आता त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे दिसते. कारण, मारुती सुझुकीने आपली पहिल्या इलेक्ट्रिक कार मारुती eVX ची चाचणी सुरू केली आहे. कंपनीने आपल्या या कारची संकल्पना याच वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये जगासमोर ठेवली होती. अशा पद्धतीने आता इलेक्ट्रिक कार बाजारात दिग्गज कार कंपनीची एन्ट्री होत आहे.

आता या कॉन्सेप्ट कारचे प्रोटोटाईप मॉडेल टेस्टिंगदरम्यान स्पॉट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  Maruti eVX पोलंडमधील क्राकोव (Krakow) येथे एका चार्जिंग स्टेशनवर दिसून आली आहे. हिचे काही फोटोज स्तानिक वेबसाइट ऑटोगॅलेरियाने इंटरनेटवर अपलोड केले आहेत. मात्र, ही टेस्टिंग व्हेहिकल पूर्णपणे कॅमोफ्लेज कव्हर होती. मात्र असे असले तरी कारचा  लुक आणि डिझाइनसंदर्भात बरीच माहिती मसोर येऊ शकते.

अशी आहे मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार - Maruti eVX एसयूव्हीचा लुक साधारणपणे कॉन्सेप्ट मॉडेल प्रमाणेच आहे. हिच्या ब्लँक्ड-ऑफ ग्रिल आणि L-शेपच्या हेडलॅम्प्ससह अपराइट फ्रंट फेस देण्यात आला आहे. यात फ्लेयर्ड व्हील आर्च आणि सी-पिलर माउंटेड रिअर डोर हँडल दिसत आहेत.  तर मागच्या बाजूला स्लिम रॅपअराउंड टेललाइट्स आणि एक इंटीग्रेटेड रूफ स्पॉइलर देण्यात आले आहे.

सिंगल चार्जमध्ये 550 Km ची  रेन्ज -मारुती सुझुकीने ऑटो एक्सपोदरम्यान ही कन्सेप्ट सादर करताना, ही SUV सुझुकी मोटर कार्पोरेशनने डिझाईन केल्याचे म्हटले होते. Maruti eVX इलेक्ट्रिक कॉन्सेप्टमध्ये कंपनी 60kWh एवढ्या क्षमतेचा बॅटरी पॅक वापरत आहे. ज्यामुळे साधारणपणे सिंगल चार्जमध्ये 550 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळेल. या कारची लांबी 4,300mm, रुंदी 1,800mm तर उंची 1,600mm एवढी आहे. ही कार पूर्णपणे नव्या डेडिकेटेड इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. कंपनी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 2025 पर्यंत बाजारात उतरवण्याची शक्यत आहे.

 

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारcarकार