शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

भन्नाट! नव्या Mahindra XUV700 मध्ये बसवलं CNG किट; मारुतीपेक्षाही मिळतंय जास्त मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 3:17 PM

Mahindra XUV700 CNG Kit: अहमदाबादमधील एका ऑटोमोबाइल वर्कशॉपनं महिंद्राची पावरफूल एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही ७०० मध्ये चक्क CNG कीट बसवलं आहे. 

नवी दिल्ली-

Mahindra XUV700 CNG Kit Price Mileage: कल्पनाशक्तीला कशाची तोड नाही असं म्हटलं जातं आणि याचं एक ताजं उदाहरण अहमदाबादमधील एका ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये पाहायला मिळत आहे. एका पठ्ठ्यानं चक्कं नुकत्याच लॉन्च झालेल्या महिंद्राच्या XUV700 मध्ये सीएनजी कीट बसवण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे यात त्याला यश देखील मिळालं आहे. एकदम पावरफुल लूक असलेल्या महिंद्राच्या XUV700 मध्ये सीएनजी किट बसवण्याचा खर्च देखील अधिक आला नाही. इतकंच काय तर कारनं चक्क २५ किमी प्रतिकिलो मायलेज देखील दिलं आहे. XUV700 मध्ये सीएनजी किट बसवण्यासाठी नेमका किती खर्च आला आणि त्याची सिलिंडर क्षमता नेमकी किती आहे हे जाणून घेऊयात...

अहमदाबादमध्ये स्थायिक असलेल्या एका महिंद्रा XUV700 कारच्या मालकानं आपल्या कारमध्ये शहरातील एका वर्कशॉपमध्ये जाऊन सीएनजी किट बसवलं आहे. महिंद्रा XUV700 मध्ये सीएनजी किट असलेली भारतातील ही पहिली कार ठरलेली असल्याचा दावा देखील कार मालकानं केला आहे. Mahindra XUV700 AX5 या पाच आसनी व्हेरिअंटमध्ये सीएनजी किट बसविण्यात आली आहे. या एसयूव्हीमध्ये चार सिलिंडर २ लीटर टर्बो चार्ज्ड पेट्रोल इंजिन बसवण्यात आलं आहे. कारचा बूट स्पेस अधिक असल्यामुळे प्रत्येकी १२ किलोग्रॅमचे दोन सिलिंडर कारमध्ये सहज बसवता आले आहेत. त्यामुळे कारची एकूण सीएनजी क्षमता २४ किलोग्रॅम इतकी झाली आहे. महिंद्रा XUV700 मध्ये सीएनजी किट बसवण्याचा एकूण खर्च १.६ लाख इतका आला आहे. 

जबरदस्त मायलेजमहिंद्रा XUV700 मध्ये सीएनजी बसवल्यानंतर कारच्या मायलेजचा विचार करायचा झाल्यास एका किलोग्रॅम सीएनजीमध्ये कार २५ किमी अंतर कापत असल्याचा दावा कार मालकानं देला आहे. म्हणजेच प्रति किलोमीटरचा खर्च फक्त २.५ रुपये इतका आला आहे. महिंद्रा कंपनी सध्या XUV700 कार फक्त पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायातच उपलब्ध करून देत आहे. याचं सरासरी मायलेज १२ किमी सांगण्यात येत आहे. त्यात आता कारमध्ये सीएनजी बसवल्यामुळे मायलेज जवळपास दुप्पट मिळत असल्याचा दावा केला गेला आहे. अहमदाबादमधील या वर्कशॉपनं कार मालकाला सीएनजी कीटची दोन वर्षांची वॉरंटी देखील दिली आहे. 

महत्त्वाची बाब अशी की XUV700 कारची किंमत तब्बल १२.५० लाखांपासून (एक्स शोरुम) सुरू होते. कारमध्ये काही बदल केले तर कंपनीकडून दिली जाणारी वॉरंटी संपुष्टात येते. तरीही या पठ्ठ्यानं एवढ्या महागड्या आणि अद्ययावत फिचर्स असलेल्या SUVला सीएनजी किट लावण्याचा पराक्रम केला आहे. 

CNG कारची मागणी वाढलीदेशात आता CNG सोबतच इलेक्ट्रीक कारच्या मागणीला जोर धरला आहे. ग्राहका आता बचतीकडे अधिक लक्ष देत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना पर्यावरणपूरक व कमी खर्चीक इलेक्ट्रीक, सीएनजी पर्यायाला पसंती दिली जात आहे. यंदाच्या वर्षात मारुती सुझूकी भारतात पहिली सीएनजी एसयूव्ही मारुती सुजुकी विटारा ब्रेजा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. येत्या काळात टाटा नेस्कॉन देखील सीएनजी पर्यायात उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा मानस आहे. या वर्षात आणखी काही कंपन्या सीएनजी कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobile Industryवाहन उद्योग