शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

टाटा-महिंद्रासारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान; 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार!  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:44 PM

Electric Car : पुढील महिन्यात लाँच झाल्यानंतर Citroen eC3 ची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा, महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

नवी दिल्ली : फ्रान्स कार निर्माता कंपनी सिट्रोनने (Citroën) आपल्या C3 हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने नवीन इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. या इलेक्ट्रिक व्हर्जनला eC3 असे नाव देण्यात आले आहे. ऑल-इलेक्ट्रिक C3 भारतात फेब्रुवारी 2023 मध्ये लाँच होणार आहे. पुढील महिन्यात लाँच झाल्यानंतर Citroen eC3 ची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा, महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

Citroen eC3 डिझाईनच्या बाबतीत, eC3 ही भारतातील बाजारात उपलब्ध असलेल्या कंपनीच्या ICE म्हणजेच पेट्रोल मॉडेल C3 सारखी आहे. यामध्ये सिट्रोन लोगो आणि सेमी-क्रॉसओव्हर डिझाइन असणाऱ्या स्लीक ग्रिलसह एक प्रकारच्या डिझाइनला राखून ठेवते. हे अगदी क्रॉसओवरसारखे दिसते, परंतु कंपनी त्याला हॅचबॅक म्हणत आहे.

रेंज, चार्जिंग आणि बॅटरीभारतात लवकरच लाँच होणार्‍या Citroen eC3 मध्ये 29.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो पूर्ण चार्ज केल्यावर 320 किमीची रेंज देतो. बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटर 56 bhp आणि 143 Nm टॉर्क निर्माण करते, ज्याचा टॉप स्पीड 107 kmph आहे. बॅटरी पॅक डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे 57 मिनिटांत बॅटरी पॅक 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते, तर सामान्य चार्जरद्वारे 10 ते 100 टक्के चार्जिंगला 10 तास 30 मिनिटे लागतात.

फीचर्स आणि सेफ्टीआगामी इलेक्ट्रिक कारच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यामध्ये आपल्या आयसीई मॉडेल सारखे मॅन्युअल एसी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 10-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम यासारखे अनेक फीचर्स मिळतील. तसेच, Citroen eC3 लाईव्ह आणि फील या दोन मॉडेलमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.

याशिवाय, कारमध्ये वायरलेस Apple CarPlay/Android Auto सह 10.2-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, चार-स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट मिळेल. कारमध्ये कनेक्टेड कार टेक देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये चार्जिंग स्टेटस, लोकेशन आणि इतर अनेक फीचर्सला ऍक्सेस करता येतात. सेफ्टी फीचर्समध्ये ईबीडीसह एबीएस आणि ड्युअल एअरबॅगचा समावेश आहे.

टॅग्स :Citroen Indiaसिट्रॉनElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन