Cheapest 7 Seater Cars : या आहेत 3 सर्वात स्वस्त 7-सिटर कार, पहिल्या कारची किंमत फक्त 5.42 लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 00:51 IST2023-01-26T00:50:37+5:302023-01-26T00:51:18+5:30
देशात स्वस्तातल्या 7-सीटर कारचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात...

Cheapest 7 Seater Cars : या आहेत 3 सर्वात स्वस्त 7-सिटर कार, पहिल्या कारची किंमत फक्त 5.42 लाख रुपये
जर आपली फॅमिली मोठी असेल आणि आपण नवी कार घेण्याचा विचार करत असाल तर, आपल्या मनात 7 सीटर कार घेण्याचा विचारही नक्कीच आला असेल. पण, आपल्या पैकी अनेकांना केवळ 7-सीटर कार महाग असल्याने हा विचार सोडावाही लागला असेल. मात्र, देशात स्वस्तातल्या 7-सीटर कारचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तर जाणून घेऊयात...
Maruti Suzuki Eeco -
मारुती ईको 5-सीटर आणि 7-सीटर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हिच्या 5-सीटर व्हर्जनची किंमत 5.10 लाख रुपयांपासून सुरू होते. तर 7-सीटर व्हर्जनची किंमत केवळ 5.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी फ्यूअल ऑप्शनमध्ये येते. ही कार सीएनजीवर 26KM पर्यंतचे मायलेज देऊ शकते.
Renault Triber -
रेनो ट्रायबरची किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 1.0 लिटर, नॅच्युरली एस्पीरेटेड, 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन ऑफर करण्यात आले आहे. हे इंजिन 72PS/96NM आऊटपुट जनरेट करते. या कारमध्ये 84 लिटरचे बूट स्पेस, 8 इंचांचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्टिअरिंग-माउंटेड कंट्रोलस, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, 6-वे अॅडजस्टेड ड्रायव्हर सीट आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प सारखे फीचर्स मिळतात.
Maruti Ertiga -
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे मारुती अर्टिगा. हिची किंमत 8.41 लाख रुपयांपासून शुरू होते. या कारमध्येही पेट्रोल आणइ सीएनजी फ्यूअल ऑप्शन मिळते. या एमपीव्हीमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन (माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी) मिळते. हिचे इंजिन 103PS आणि 137Nm आऊटपुट जनरेट करते. सीएनजीवर ही कार 26KM एवढे मायलेज देते.