शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाकिस्तानात वॅगनआर 32 तर अल्टो 24 लाख रुपयांना, Fortuner ची किंमत ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 14:35 IST

Cars too expensive in Pakistan : पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.

Cars too expensive in Pakistan : भारताचा शेजारील देश पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याचा परिणाम तेथील दैनंदिन वस्तूंशिवाय ऑटोमोबाईल क्षेत्रावरही स्पष्टपणे दिसून येतोय. महागाईमुळे सर्वसामान्यांसाठी कार खरेदी करणे मोठे आव्हान बनले आहे. विशेष म्हणजे, भारतापेक्षापाकिस्तानात कैक पटीने महाग कार विकत घ्यावी लागते. 

पाकिस्तानमध्ये कारच्या किमती गगनाला भिडल्या पाकिस्तानमध्ये कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भारतात त्याच गाड्या अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहेत. काही प्रमुख कार्सची तुलना करायची झाल्यास भारतात मारुती सुझुकी वॅगनआरची सुरुवातीची किंमत 5.54 लाख रुपये आहे, तर पाकिस्तानमध्ये याच कारची किंमत 32.14 लाख रुपये आहे. Alto बद्दल बोलायचे झाले तर, भारतीय बाजारात तिची सुरुवातीची किंमत फक्त 3.99 लाख रुपये आहे, तर पाकिस्तानमध्ये या कारची किंमत 23.31 लाख रुपयांपासून सुरू होते.

भारतात स्विफ्टची किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरू होते, तर पाकिस्तानमध्ये त्याची किंमत 47.19 लाख रुपयांपासून सुरू होते. टोयोटा फॉर्च्युनर बद्दल बोलायचे झाले तर, भारतात या कारची किंमत 33.43 लाख रुपये आहे, तर पाकिस्तानमध्ये या कारची किंमत 1.45 कोटी रुपये आहे. होंडा सिटी भारतात 11.86 लाख रुपयांना मिळते, तर पाकिस्तानमध्ये त्याची किंमत 46.5 लाख रुपये आहे.

कारच्या किमती इतक्या जास्त का आहेत?पाकिस्तानमध्ये कारच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. पाकिस्तानमधील स्थानिक उत्पादनदेखील खूप मर्यादित आहे, ज्यामुळे कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या कारणांमुळे पाकिस्तानचा ऑटोमोबाईल उद्योग प्रचंड महागाईच्या खाईत आहे.

आर्थिक अस्थिरता आणि महागाईमुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या खूपच कमकुवत आहे. सततच्या वाढत्या महागाईमुळे देशाच्या चलनाचे मूल्यही घसरत आहे, त्यामुळे वस्तू महाग होत आहेत. याशिवाय पाकिस्तानी रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत खूपच कमी आहे, त्यामुळे आयात केलेल्या कार आणि त्यांच्या पार्ट्सच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑटोमोबाईल कंपन्या हा खर्च ग्राहकांच्या अंगावर टाकतात, त्यामुळे कारच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

कंपन्या व्यवसाय बंद करत आहेतअलिकडच्या वर्षांत पाकिस्तानमधील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांचे उत्पादन कारखाने आणि आउटलेट बंद केले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे कामकाजात येणाऱ्या अडचणी आणि सरकारकडून अपेक्षित मदत न मिळणे. त्यामुळे सर्वसामान्यांना कार खरेदी करणे अधिक कठीण झाले आहे, कारण आता देशात कारची उपलब्धताही मर्यादित होत आहे. पाकिस्तानमध्ये कार खरेदी करणे आता सर्वसामान्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. दुसरीकडे, भारतात अत्यंत स्वस्त दरात गाड्या उपलब्ध आहेत. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतAutomobileवाहनEconomyअर्थव्यवस्थाInflationमहागाई