शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'ही' आहे सर्वात स्वस्त फॅमिली कार, 7 लोक आरामात बसू शकतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 14:32 IST

तुम्हीही कमी बजेटमध्ये चांगली फॅमिली कार शोधत असाल तर मारुती एर्टिगा (Maruti Ertiga) तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो.

नवी दिल्ली : भारतात पर्सनल वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. सध्याच्या काळात लोक कुठेही ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीऐवजी स्वतःची गाडी घेऊन जाण्यास प्राधान्य देत आहेत. एकीकडे 5 सीटर एसयूव्ही वाहनांची वाढती मागणी असताना आता लोक आपल्या कुटुंबानुसार मोठी 7 सीटर कार शोधताना दिसून येत आहे. या कारमध्ये संपूर्ण कुटुंब एकाच वेळी प्रवास करू शकते. तुम्हीही कमी बजेटमध्ये चांगली फॅमिली कार शोधत असाल तर मारुती एर्टिगा (Maruti Ertiga) तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो.

भारतीय बाजारपेठेत मारुती अर्टिगाची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 12.93 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनी LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या पर्यायांसह चार मॉडेल्समध्ये कारची विक्री करते. विशेष म्हणजे टॉप 2 मॉडेल्समध्ये सीएनजी किटचा पर्यायही देण्यात आला आहे. चांगल्या मायलेजसोबतच या मॉडेल्समध्ये जबरदस्त फीचर्सही मिळतात. एर्टिगा 6 सिंगल कलरमध्ये खरेदी करता येईल, ज्यात ऑबर्न रेड, मॅग्मा ग्रे, पर्ल मेटॅलिक आर्क्टिक व्हाइट, पर्ल मेटॅलिक डिग्निटी ब्राउन, प्राइम ऑक्सफर्ड ब्लू आणि स्प्लिंडिड सिल्व्हर यांचा समावेश आहे.

शानदार आहेत फीचर्समारुतीच्या 7 सीटर कारला 209-लिटरची चांगली बूट स्पेस देखील मिळते, जी आवश्यक असल्यास मागील सीट खाली फोल्ड करून 550-लिटरपर्यंत वाढवता येते. कारच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, एर्टिगामध्ये MID वर TBT (टर्न-बाय-टर्न) नेव्हिगेशनसह वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. याशिवाय, पॅडल शिफ्टर्स, क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलाइट्स आणि ऑटो एसी सारखी फीचर्स देखील मिळतात.

इंजिन आणि मायलेज7 सीटर कारमध्ये माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 103PS पॉवर आणि 137 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. यामध्ये CNG पॉवरट्रेन देखील मिळते, ज्याचे आउटपुट 88 PS आणि 121.5Nm करते. तसेच, कारमध्ये पेट्रोलसह 20 किमी प्रति लिटर आणि सीएनजीसह 26 किमी प्रति किलो मायलेज देते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन