शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

...तर गाडीही तुमची काळजी घेईल!

By हेमंत बावकर | Published: September 24, 2018 2:17 PM

आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात.

आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात. यामुळे गाडीच्या देखभालीकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. बऱ्याचदा गाडीही आपल्याला संकेत देत असते. मात्र आपण त्याकडे जाणते-अजाणतेपणी दुर्लक्ष करतो. पहा काय घ्यायची काळजी.

इंजिन ऑईलवाहनाचे हृदय म्हणजे त्याचे इंजिन. त्याच्या आतील पिस्टनना कार्य करण्यासाठी वंगन म्हणून इंजिन ऑईल असते. प्रत्येक कंपनीचा त्या इंजिन ऑइलच्या ग्रेडनुसार बदलण्याचा कालावधी असतो. कंपनीने दिलेले किलोमिटर जरी पार झाले नसले आणि वर्षाचा कालावधी संपला तर ऑईल बदलावेच. कारण ते ऑइल ठराविक कालावधीनंतर ‘डिसग्रेड’ म्हणजेच खराब व्हायला सुरुवात होते. यामुळे प्रवासावेळी ऐन वेगात असताना इंजिन गरम होऊन रस्त्यातच वाहन बंद पडण्याचे प्रकार होतात. याचा कुलंटवरही परिणाम होतो आणि वाहन रस्त्यातच थांबल्यास अपघातही होण्याची शक्यता असते. उष्णतेवरही कुलंटचे आयुष्य असते. जास्त उष्णतेच्या ठिकाणी कुलंट लवकर खराब होते. 

व्हील अलाइनमेंटवाहनाचा मोठा खर्च असतो तो म्हणजे टायरचा. ३० हजार किमी टायर चालतो. मात्र, या टायरची नीट काळजी न घेतल्यास प्रवासावेळी टायर फुटणे, पंक्चर होणे, अवेळी झीज झाल्याने ब्रेक न लागणे अशा घटना घडतात. यासाठी वेळोवेळी टायर अदलाबदली, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग करणे गरजेचे असते. तसेच टायरची हवा वेळोवेळी तपासणे आवश्यक असते. उपलब्ध असल्यास नायट्रोजन गॅस भरावा.

वाहन नेहमी  चालत नसल्यासबऱ्याचदा वाहने सावलीखाली किंवा उन्हात आठवडा आठवडा धूळ खात उभी केलेली असतात. वाहनाचे वजन टायरच्या एकाच भागावर पडल्याने हवा कमी होत राहते. त्यामुळे टायरला गोल कातरे(भेग) पडतात. हवेचा दाब नीट ठेवावा लागतो. वायपर काचेवरच न ठेवता ते उभे करून ठेवावे. वातावरणातील बदलांमुळे वायपरचे रबर टणक होऊ लागतात. यामुळे काचेवरील धूळ काढण्याऐवजी ते काचेवर ओरखडे काढतात.

ब्रेक ऑईलवाहन थांबण्यासाठी ब्रेक प्रणाली चांगली असावी. त्यामुळे ब्रेक पॅड वेळच्यावेळी बदलण्याबरोबरच ब्रेक फ्लुएड किंवा ऑईलही बदलणे गरजेचे असते. वाहन सारखेच वाहतूक कोंडी किंवा ब्रेक लावावे लागणाऱ्या भागात फिरत असल्यास वेळचेवेळी लक्ष द्यावे.

इंडीकेटरवाहनाचे इंडिकेटर दिवसा व रात्रीही गरजेचे असतात. लाईट, डावा-उजवा इंडिकेटर सुरु आहे का, याची तपासणी वेळोवेळी करावी. तसेच ब्रेकलाईट लागते का याचीही तपासणी करावी.

टॅग्स :carकारAutomobileवाहनroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्ग