बजेटमध्ये फिट व फीचर्समध्ये हीट असलेल्या 'या' शानदार कार, किंमत 10 लाखांच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 04:49 PM2023-05-21T16:49:13+5:302023-05-21T16:59:07+5:30

जर तुमचे बजेट 10 लाख रुपये असेल तर या कार उत्तम फीचर्सने सुसज्ज आहे.

car under 10 lakh : car tata altroz xza dct maruti suzuki baleno alpha amt citroen shine turbo mt toyota glanza v amt | बजेटमध्ये फिट व फीचर्समध्ये हीट असलेल्या 'या' शानदार कार, किंमत 10 लाखांच्या खाली

बजेटमध्ये फिट व फीचर्समध्ये हीट असलेल्या 'या' शानदार कार, किंमत 10 लाखांच्या खाली

googlenewsNext

भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा जास्त कार आहेत. त्या फीचर्सच्याबाबतीत सुद्धा दमदार आहेत. तुम्हीही तुमच्यासाठी नवीन कार घेण्याचा विचार करत आहात, तर आज आम्ही काही कारची लिस्ट घेऊन आलो आहोत. जर तुमचे बजेट 10 लाख रुपये असेल तर या कार उत्तम फीचर्सने सुसज्ज आहे. 2023 मध्ये 10 लाख रुपयांच्या खाली असलेल्या शानदार कार अनेक फीचर्सनी सुसज्ज आहेत.

Tata Altroz XZA+ DCT
सध्या या कारची किंमत 10 लाख रुपये आहे. यात कनेक्टेड कार टेकसह सात-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅम्बियंट लाइटिंग, क्रूझ कंट्रोल आणि बरेच काही मिळते. कारला अलीकडच्या काळात सनरूफही मिळतं.

Maruti Suzuki Baleno Alpha AMT
मारुती सुझुकी बलेनो अल्फा एएमटी हा प्रीमियम हॅचबॅक टॉप-एंड व्हेरिएंट आहे, त्यात वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह नऊ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अर्कामीस साउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ, ऑटो एसी, पुश- बटण स्टार्ट/ स्टॉप, कीलेस एंट्री, सहा एअरबॅग्ज सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. कारची किंमत 9.88 लाख रुपये आहे.

Citroen Shine Turbo MT
Citroen Shine Turbo MT ची भारतीय बाजारपेठेत किंमत 8.92 लाख रुपये आहे. यामध्ये 10.2-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह कनेक्टेड-टेक हाइट-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, चार-स्पीकर साउंड सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिकली एडजस्टेबल ओआरव्हीएम आणि स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल मिळते.

Toyota Glanza V AMT
Toyota Glanza V AMT ची किंमत 10 लाख रुपये आहे. मारुती सुझुकी बलेनोच्या टॉप-एंड अल्फा एममटी व्हर्जनवर आधारित आहे. यात वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, Arkamys साउंड सिस्टीम, HUD, सहा एअरबॅग्ज इत्यादीसह नऊ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळते.

Hyundai Grand i10 NIOS
भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत 8.51 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, वायरलेस फोन चार्जर, ऑटो एसी, रिअर एसी व्हेंट्स, क्रूझ कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप यासारख्या खास फीचर्ससह येते.

Renault Kiger RXZ AMT
या कारची किंमत 9.35 लाख रुपये आहे. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटो क्लायमेट कंट्रोल आहे.

MG Comet EV Plush
या लिस्टमधील एकमेव ईव्ही, ज्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या कारची किंमत 9.98 लाख रुपये आहे. यात एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प, ड्युअल 10.25-इंच डिस्प्ले, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, कनेक्टेड-टेक, कीलेस एंट्री देखील मिळते.

Web Title: car under 10 lakh : car tata altroz xza dct maruti suzuki baleno alpha amt citroen shine turbo mt toyota glanza v amt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.