शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कार विकायची आहे? फॉलो करा या सोप्या टिप्स, विक्रीतून मिळेल घसघशीत रक्कम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 15:44 IST

Second Hand Car Sale: तुम्ही तुमची कार विकण्याचा विचार करत असाल तर काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या सेकंड हँड कारच्या विक्रीतूनही चांगली रक्कम मिळू शकते.

कारचे नवनवे मॉडेल्स जससजे बाजारात येतात तसतसे लोक आपल्या कारनां अपग्रेड करत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची कार विकण्याचा विचार करत असाल तर काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या सेकंड हँड कारच्या विक्रीतूनही चांगली रक्कम मिळू शकते.

काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म कार एका दिवसामध्ये खरेदी करतात. तर ओएलएक्ससारख्या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या कारची फ्रीमध्ये जाहिरात करून ती सहजपणे विकू शकता. आणखी एक चांगला पर्याय म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या कारला अपग्रेड कराल तेव्हा जवळपास प्रत्येक कंपनी तुम्हाला एक्स्चेंज ऑफर देते. त्यात तुम्ही कार एक्सचेंजसुद्धा करू शकता. त्यात तुम्हाला डाउन पेमेंटमध्ये होतो. खालील काही गोष्टींचा विचार केल्यास कार विकताना चांगला फायदा होऊ शकतो.

- कार विकण्यापूर्वी कारची सर्व्हिस करून घ्या. ज्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करून घ्या. इंजिन ऑईल, एअर फिल्टर आणि फ्युएल फिल्टर बदलून घ्या. इंजिन ऑईल, एअर फिल्टर आणि फ्युएल फिल्टर बदलून घ्या. त्याबरोबरच डेंटरजवळ कारमधून येणारा आवाजही दुरुस्त करून घ्या. बराच काळ कार वापरल्यानंतर गेट खिडकी आणि फेंडर्समधून आजाव येऊ लागतो. डेंटर त्यांना काही वेळात दुरुस्त करेल.- कारची सर्व्हिस हिस्ट्री काढा. त्यातून तुम्ही कार मेंटेन केलेली आहे  आणि योग्य वेळी तिची सर्व्हिसिंग केलेली आहे हे समजेल. तसेच मेंटेन केलेल्या कारची किंमत नेहमी चांगली मिळते.- कार विकण्याआधी पहिल्यांदा त्यावर टचिंग करा. कुठे स्क्रॅच किंवा डेंट आले असतील तर ते दुरुस्त करा. त्याबरोबरच रबिंग आणि पॉलिशसुद्धा करा. ते तुमच्या कारला एकदम नव्यासारखी करेल. तसेच अशा कारकडे खरेदीदार आकर्षित होईल. - कारच्या इंटिरियरवरही लक्ष असू द्या. कारला ड्रायक्लीन करून घ्या. त्यामुळे कारची प्रॉपर क्लिनिंग होईल. तसेच एक फ्रेश फिल मिळेल. - काक विकण्याआधी टायर तपासून घ्या. कारचे टायर खराब झाले असतील तर बदलून घ्या. टायर हा असा भाग आहे, ज्यावर खरेदीदारचं पहिलं लक्ष जातं. - बराच काळ कार वापरल्यानंतर हेडलाइट्सची शाइन कमी होते. तसेच त्या पिवळ्या दिसू लागतात. त्यासाठी हेडलाइट्सची बफिंग करून घ्या. बफिंगनंतर हेडलाइट्स एकदम नव्यासारख्या चमकतील. कारच्या एसीची सर्व्हिस अवश्य करून घ्या. ही कार दर दिवशी वापरण्यासारखं फिचर आहे, तसेच लोक एसीच्या परफॉर्मंन्सवर खूप लक्ष देतात. थंडावा देणाऱ्या कारमधून बसून कुणालाही आरामदायक वाटते.  

टॅग्स :carकारAutomobileवाहन