शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

1 कोटी रुपयांची TATA Safari! नेपाळ आणि पाकिस्तानमधील कारच्या किमती, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 11:17 IST

car prices : भारतात विकल्या जाणार्‍या अनेक गाड्या पाकिस्तानातही विकल्या जातात, पण तिथल्या या गाड्यांच्या किमती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

नवी दिल्ली : भारतातील अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपली गाड्या नेपाळसह इतर शेजारील देशांमध्ये निर्यात करतात. मात्र, शेजारील देशांमध्ये या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. हा कर आकारल्यानंतर या गाड्यांची किंमत भारताच्या तुलनेत जवळपास 3 पट वाढते. भारतात विकल्या जाणार्‍या अनेक गाड्या पाकिस्तानातही विकल्या जातात, पण तिथल्या या गाड्यांच्या किमती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

टाटा सफारी (TATA Safari) या एसयूव्हीची भारतातील एक्स-शोरूम किंमत 15.25 लाख ते 23.46 लाख रुपये आहे. तर नेपाळमध्ये या कारची किंमत 63.56 लाख रुपये आहे, जी भारतातील तुलनेत जवळपास 2.7 पट जास्त आहे. नेपाळमध्ये 6 आणि 7-सीटर टाटा सफारीची एक्स-शोरूम किंमत 83.49 लाख रुपये ते 1 कोटी रुपये आहे. भारतीय बाजारात किआ सॉनेटची (Kia Sonnet) एक्स-शोरूम किंमत 7.15 लाख रुपयांपासून सुरू होते. नेपाळमध्ये या कारची किंमत 36.90 लाख रुपयांपासून सुरू होते, जी भारतीय चलनानुसार अंदाजे 23.10 लाख रुपये आहे. नेपाळमध्ये महागड्या गाड्यांवर सरकार 298 टक्के कर वसूल करते.

पाकिस्तानमधील ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पाहिले तर येथील बाजारात सुझुकी अनेक कारची विक्री करते. ज्या भारतात देखील उपलब्ध केल्या जातात, यामध्ये ऑल्टो, वॅगनआर आणि स्विफ्ट यांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये ऑल्टोची किंमत 14.75 लाख रुपयांपासून सुरू होते, जी भारतात 6 लाख रुपये इतकी आहे. याचबरोबर, पाकिस्तानमध्ये वॅगनआरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 20.84 लाख पाकिस्तानी रुपये आहे, जी भारतीय चलनात सुमारे 8.47 लाख रुपये आहे. याशिवाय, पाकिस्तानात विकली जाणारी वॅगनआर ही हॅचबॅक आधीची जनरेशन आहे, तर नवीन जनरेशनची कार भारतात जवळपास 3 वर्षांपासून विकली जात आहे.

सुझुकी स्विफ्टबद्दल सांगायचे झाले तर पाकिस्तानमध्ये या हॅचबॅकच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 27.74 लाख पाकिस्तानी रुपये आहे, जी भारतीय चलनात सुमारे 11.28 लाख रुपये आहे. मारुती सुझुकी ऑल्टोची भारतातील एक्स-शोरूम किंमत फक्त 3.39 लाख रुपये आहे, तर मारुती सुझुकी वॅगनआर आणि स्विफ्टची भारतातील एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 5.47 लाख रुपये आणि 5.92 लाख रुपये आहे. त्यामुळे शेजारी देश भारतात विकल्या जाणाऱ्या या गाड्यांच्या किमतीच्या दुप्पट ग्राहकांकडून शुल्क आकारत असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकारNepalनेपाळPakistanपाकिस्तानIndiaभारत