Car Discount Offer: देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारवर मिळतोय 50 हजारांचा डिस्काउंट, किंमत फक्त 4.59 लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 19:57 IST2022-11-11T19:56:27+5:302022-11-11T19:57:56+5:30
येथे आम्ही आपल्याला मारुतीच्या अशा दोन गाड्यांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांवर सर्वाधिक सूट मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, यांत ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या कारचाही समावेश आहे.

Car Discount Offer: देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारवर मिळतोय 50 हजारांचा डिस्काउंट, किंमत फक्त 4.59 लाख
सणासुदीचा हंगाम संपला असला तरी, कारवरील ऑफर्स अद्यापही संपलेल्या नाहीत. नोव्हेंबर महिन्यातही ह्युंदाई आणि मारुती सुझुकी सारख्या कंपन्या आपल्या गाड्यांवर डिस्काउंट ऑफर देत आहे. मारुती सुझुकीच्या गाड्यांवर तब्बल 50 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. येथे आम्ही आपल्याला मारुतीच्या अशा दोन गाड्यांसंदर्भात माहिती देत आहोत, ज्यांवर सर्वाधिक सूट मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, यांत ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या कारचाही समावेश आहे.
देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारवर 50 हजारांची सूट -
ऑक्टोबर महिन्यात देशातील सर्वाधिक विकली गेलेली कार म्हणजे मारुती ऑल्टो (Maruti Alto). गेल्या महिन्यात या गाडीच्या तब्बल 21,260 युनिटची विक्री झाली. मारुती ऑल्टो, Alto 800 आणि Alto K10 अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. नोव्हेंबर महिन्यात कंपनी ऑल्टो के10 वर 50 हजार रुपयांची सूट अथवा डिस्काउंट देत आहे.
मारुती सुझुकी ऑल्टो के10 ची किंमत 4.59 लाख रुपयांपासून सुरू (एक्स-शोरूम) होते. नोव्हेंबर महिन्यात आपण ही कार आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. या गाडीवर 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट ऑफर केला जात आहे.
एवढेच नाही तर, मारुती सुझुकी आपल्या S-Presso कारवरही 50 हजार रुपयांची सूट देत आहे. या डिस्काउंटमध्ये 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय यात, 15 हजार रुपयांच्या एक्सचेन्ज बोनसचा आणि 5 हजार रुपयांच्या कार्पोरेट डिस्काउंटचाही समावेश आहे. या गाडीची किंमत 4.88 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.