BYD ची सील ईलेक्ट्रीक कार लाँच; ६५० किमीची रेंज, मुंबई-पुणे-मुंबई दोनदा शक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 14:31 IST2024-03-05T14:30:42+5:302024-03-05T14:31:38+5:30
BYD Seal EV Range, Price: बीवायडीने या कारमध्ये दोन बॅटरीपॅक दिले आहेत. किंमतही मध्यम श्रीमंतांच्या आवाक्यात.

BYD ची सील ईलेक्ट्रीक कार लाँच; ६५० किमीची रेंज, मुंबई-पुणे-मुंबई दोनदा शक्य
चायना कंपनी बीवायडीने लाँग रेंजची ईलेक्ट्रीक सेदान कार भारतीय बाजारात लाँच केली आहे. Seal EV ला गेल्यावर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये दाखविण्यात आले होते. परंतु काही कारणाने लाँचिंगला विलंब लागत होता.
बीवायडीने या कारमध्ये दोन बॅटरीपॅक दिले आहेत. यामध्ये एक 61.44 kWh आहे, तर दुसरी बॅटरी 82.56 kWh ची देण्यात आली आहे. प्रीमियम रेंज आणि परफॉर्मंस असे दोन व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहेत. १.२५ लाख रुपयांची रक्कम देऊन बुक करता येणार आहे.
या कारची किंमत ४१ लाखांपासून सुरु होत आहे. तर सर्वात महागडे व्हेरिअंट ५३ लाख रुपयांवर जाते. डायनामिक रेंजच्या कारमध्ये रिअर व्हील ड्राईव्ह पावर ट्रेन तर प्रीमियम रेंज व्हेरिअंटमध्ये ऑल-व्हील ड्राइव पावरट्रेन देण्यात आले आहे.
परफॉर्मंस व्हेरिअंटमध्ये दोन इंजिन एकाचवेळी वापरण्यात येत आहेत. यामुळे ही इंजिन 522 बीएचपी ताकद आणि 670 एनएम एवढा प्रचंड टॉर्क उत्पन्न करतात. तर डायनामिक व्हेरिअंटमध्ये 201 बीएचपी ताकद आणि 310 एनएम टॉर्क निर्माण केला जातो.
डायनॅमिक रेंज एका चार्जवर 510 किमी पर्यंत, प्रीमियम रेंजसाठी त्याची रेंज 650 किमी आणि परफॉर्मन्स व्हेरियंटची रेंज 580 किमीपर्यंत आहे. थ्री-स्पोक मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यात पॅनोरामिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, हवेशीर जागा, वायरलेस चार्जिंग आणि लेव्हल 2 EDAS देखील देण्य़ात येणार आहे.